शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

प्रशासनाचा नागरिकांशी ‘व्हिडिओ’ संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:00 AM

कोराना संसर्गाचा धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही व्हिडीओ कॉलची सुविधा सुरू झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून त्याबाबत मदतीसाठी दूरध्वनी क्र मांकही देण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका : जिल्हाधिकारी कार्यालयात फिजिकल डिस्टन्स्ािंगचा अनोखा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याची बाधा सरकारी यंत्रणेला होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हिडिओ कॉलद्वारे संवादाचा प्रयोग सुरू केला आहे. प्रशासन आणि नागरिकांमध्ये शारीरिक अंतर कायम ठेवताना संवादात मात्र अंतर पडू नये यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.कोराना संसर्गाचा धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही व्हिडीओ कॉलची सुविधा सुरू झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून त्याबाबत मदतीसाठी दूरध्वनी क्र मांकही देण्यात आले. तरीही नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष येवून चौकशी करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय आखण्यात आला.सध्या कोरोनालढ्यात मोठया प्रमाणात शासकीय यंत्रणा प्रत्यक्ष काम करत आहे. या संसर्गापासून यंत्रणेला दूर ठेवून नागरिकांना आवश्यक सेवा अखंड स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. आपण जेवढे शारीरिक अंतर पाळू, तेवढया प्रमाणात आपण या कोरोना संसर्गाला रोखण्यात यशस्वी होवू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हयात कोरोना संसर्ग बाधितांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग कार्यरत आहे. कोरोनाशी लढा देताना प्रत्यक्ष कार्य करणारे प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संबंध येतो. त्यामुळे अशा शासकीय कार्यालयात संसर्गाला रोखण्यासाठी या पद्धतीचे उपक्र म महत्वाचे ठरतील, असे मत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी व्यक्त केले.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ही आवश्यक उपाययोजना सुरू केली. प्रशासनाकडे दूरध्वनीवर किंवा ईमेलवर संपर्क साधून नागरिकांनी जास्तीत जास्त सामाजिक अंतर राखावे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अशाप्रकारे आवश्यक काळजी घेणे आता गरजेचे आहे.- दीपक सिंगला,जिल्हाधिकारीत्रिस्तरीय व्हिडिओ कॉलिंगची व्यवस्थाजर एखादा व्यक्ती ई-पासबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीकरीता आला तर त्याला खालच्या मुख्य दारातच ई-पासबाबत प्रत्यक्ष ऑनलाईन तपशील पाहून माहिती सांगितली जाते. जर त्याचे समाधान झाले नाही तर आपत्ती व्यवस्थापन विभागात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना पहिला व्हिडिओ कॉल केला जातो. याही ठिकाणी समाधान न झाल्यास निवासी उपजिल्हाधिकारी मार्गदर्शन करतात. त्यानंतर स्वत: जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार तिसऱ्या टप्प्यात नागरिकांशी संवाद साधतात.या सुविधेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, किशोर मडावी, संजय बारसिंगे, विक्की कन्नाके हे काम पाहात आहेत. कोरोना ई-पास, प्रवासाची परवानगी किंवा वाहतूक याबाबत कोणीही प्रत्यक्ष न येता दूरध्वनी किंवा ईमेल वर प्रथम चौकशी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या