शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

शहरी भागातील प्रत्येक कुटुंबावर प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार करणे टाळल्यास आजाराची गुंतागुंत वाढून उपचार करण्यापलिकडे जातो. त्यामुळे ही स्थिती येण्याआधीच थोडी जरी लक्षणे दिसली तरी लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची घेणार मदत : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रसार शहरातूनच खेड्याकडे होत आहे. त्यामुळे शहरातच कोरोनाला नियंत्रित ठेवल्यास ग्रामीण भागात उदे्रक होणार नाही. त्यामुळे गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरी भागात प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यविषयक स्थितीवर नजर ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था प्रशासनाकडून केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार करणे टाळल्यास आजाराची गुंतागुंत वाढून उपचार करण्यापलिकडे जातो. त्यामुळे ही स्थिती येण्याआधीच थोडी जरी लक्षणे दिसली तरी लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.सध्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात आजाराबाबत सर्व्हेक्षण सुरू असले तरी शहरी भागासाठी तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे ९ ते ११ वीच्या एक हजार विद्यार्थ्यांची यासाठी मदत घेतली जाईल. ७० हजारच्या घरात लोकसंख्या (२० हजार कुटुंब) असलेल्या गडचिरोली शहरासाठी निवडलेले विद्यार्थी मोबाईलने, व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या परिसरातील २० कुटुंबांच्या संपर्कात राहतील. त्या विद्यार्थ्यांकडील माहिती एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी आरोग्य विभागाला पुरवेल. यातून कुटुंबांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.तीन ठिकाणी नवीन सुसज्ज कोविड केंद्रजिल्ह्यात आतापर्यंत केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेले कोविड आरोग्य केंद्र आता सिरोंचा (५० बेड), अहेरी (१०० बेड) आणि एटापल्ली (५० बेड) येथेही सुरू केले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प््यात आहे. त्या ठिकाणी प्रत्येक बेडवर आॅक्सिजनची सुविधा राहणार असून चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षणही सुरू आहे.३-३ महिन्यासाठी ऐच्छिक सेवा घेणारजिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. कारण कमी पगारात जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यासाठी जाण्यास कोणी डॉक्टर तयार नसतात. पण सेवाभावी दृष्टिने जे कोणी जाण्यास तयार होतील त्यांना प्रोत्साहन देऊन ३-३ महिन्यासाठी त्यांची सेवा घेतली जाईल. त्यांना हार्डशिप अलाऊन्सही दिला जाईल, असे सीईओ आशीर्वाद यांनी सांगितले.म्हणून प्रशासक म्हणून केवळ अधिकारी ठेवलेकार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्ती निवडावी असे आदेशात म्हटले आहे. पण त्यात शासकीय अधिकारी सोडून दुसऱ्यांची नियुक्ती केली तर त्या नियुक्तीमागे राजकीय प्रभाव असल्याचे मानले जाते. हे टाळण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची कमतरता असतानाही तालुक्याच्या कृषी अधिकाºयांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद