शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये मिळत आहेत नीटचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:28 IST

आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणाऱ्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत.

ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग कुपोषित मेळघाटच्या मातीतील डॉक्टर घडविण्याचे स्वप्न

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणाऱ्या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत. आठवड्यातील शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कक्षाला ‘उलगुलान ’ असे नाव देण्यात आले आहे.धारणी प्रकल्प कार्यालय व पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट ही स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातला हा पहिला प्रयोग धारणी तालुक्यात राबविला जात आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून स्वखर्चाने बिजुधावडी येथे येऊन शिकवीत आहेत.तत्कालीन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट या स्वयंसेवी संस्थेसोबत संवाद साधून प्रयत्न केले. त्यांची प्रामाणिक तळमळ यशस्वी ठरली.विद्यार्थी वैद्यकीय परीक्षापूर्व धडे आश्रमशाळेतील एका खोलीतच गिरवतात. त्यांना शांततापूर्ण वातावरण मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यासाठी संबंधित लिफ्ट इक्विपमेंट व प्रकल्प कार्यालय प्रयत्नशील आहे. या उपक्रमातून अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. आता मेळघाटला त्यांच्या मातीतील डॉक्टर तयार होतील.- शिवानंद पेढेकर, सहायक प्रकल्प अधिकारी,आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणीतज्ज्ञ मंडळींकडून मोफत मार्गदर्शनमेळघाटच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर नसल्याने आदिवासी रुग्णांसह बालकांना नाहक जीव गमवावा लागतो. तेव्हा मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांमधून डॉक्टर निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने बिजुधावडीच्या आश्रमशाळेत उलगुलान कक्षात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे धडे दिले जात आहेत. ९ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचा मुहूर्त झाला. परिसरातील राणीगाव, टेंभली, सुसर्दा, टेम्ब्रुसोंडा, बिजुधवडी या आश्रमशाळांमध्ये इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विज्ञान शाखेच्या प्रत्येकी दहा अशा एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर संस्थेच्या तज्ज्ञ मंडळीकडून येण्या-जाण्याच्या खर्चासकट कुठलाही मोबदला न घेता मोफत नीट २०१९ वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.पुण्यात फडकला मेळघाटचा झेंडाजानेवारी महिन्यात एका कार्यक्रमांमध्ये आश्रमशाळेतील शांतीलाल सावलकर या आदिवासी विद्याथ्यार्ने पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांपुढे इंग्रजीत भाषण करून सर्वांना अचंबित केले. प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, सुधीर चव्हाण, अतुल ढाकणे, संतोष, केतन, फारुख, परिमल, आकाश आदी सहकारी राज्यातला पहिला प्रयोग यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य