शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

'अधुरा सपना पुरा करेंगे...' वांडोली चकमकीनंतर नक्षल्यांची आगपाखड!

By संजय तिपाले | Updated: August 10, 2024 21:27 IST

पत्रकातून इशारा: मौल्यवान लोहखनीज कवडीमोल दराने विकण्याचा घाट, सत्ताधाऱ्यांवर आरोप

संजय तिपाले/गडचिरोली गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील वांडाेलीच्या घनदाट जंगलात माओवादी व पोलिसांतील चकमकीत १२ माओवादी ठार झाले होते. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी १० ऑगस्ट रोजी पत्रक जारी करुन 'अधुरा सपना पुरा करेंगे...' असा टोकाचा इशारा दिला आहे. लोहखनिजावर सरकारचा डोळा असून कवडीमोल दराने ते विकण्याचा घाट असल्याचा आरोप करत आगपाखड केली आहे. 

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ठाणे हद्दीत १७ जुलै रोजी वांडोली गावानजीक सी- ६० जवान व नक्षलवाद्यांमध्ये  चकमक उडाली होती. यात तीन मोठ्या नेत्यांसह कसनसूर,कोरची,टिपागड, चातगाव दलमलचे १२ नक्षलवादी ठार झाले होते. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने १० ऑगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे. यामध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या नावाचा उल्लेख असून  चकमकीवर प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.   जिल्ह्यात असलेले मौल्यवान खनिज देशातील आणि विदेशातील उद्योगपतींना कवडीमोल दरात देण्याचा घाट असल्याचा दावा केला आहे. १७ जुलै रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत लोह प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आले होते. नेमकी त्याच दिवशी संधी साधून ही चकमक घडविण्यात आली, असा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.  ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानपूर्वक नातेवाईकांना द्यावेत, अशी मागणीही केली आहे.

वांडोली चकमकीनंतर मृत नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांचे मृतदेह   त्यांच्या कुटुंबीयांना स्वखर्चातून   सुपूर्द केले आहेत. उर्वरित तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह छत्तीसगडमधील असून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला आहे. त्यांचा निरोप येतात हे देखील मृतदेह पोहोचवून देण्यात येतील. नक्षल्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे, त्यामुळे नैराश्येतून ते आरोप करत आहेत.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली