शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

व्यसनाने आरोग्यासोबत आर्थिक स्थैर्य धोक्यात

By admin | Updated: October 25, 2016 00:57 IST

आजची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. हालअपेष्ठा, मेहनत करून कमाविलेला पैसा गुटखा, तंबाखू, खर्रा, दारू यासारख्या व्यसनांवर खर्च केला जातोे.

सत्यपाल महाराजांचे मार्गदर्शन : चामोर्शी येथे कीर्तन; अनिष्ठ रूढींवर केला प्रहार; पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थितीचामोर्शी : आजची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. हालअपेष्ठा, मेहनत करून कमाविलेला पैसा गुटखा, तंबाखू, खर्रा, दारू यासारख्या व्यसनांवर खर्च केला जातोे. यामुळे समाजाचे स्वास्थ, सामाजिक सुरक्षा व स्वत:चे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे असल्याचे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांनी केले. मुक्तीपथ महाराष्ट्र शासन, सर्च, टाटा स्ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन रविवारी रात्री करण्यात आले होते. याप्रसंगी कीर्तनातून ते मार्गदर्शन करत होते. तुकड्या दास म्हणे, ऐकाना व्यसने सगळी सोडून द्याना!, सरळपणाचे जीवन जगाना, लोभ सर्वांचे कराना! व्यसनामध्ये पैसा खर्च करून आर्थिक नुकसान करून घेण्यापेक्षा तोच पैसा शिक्षणासाठी कुटुंबाच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करा, पोथी वाचा किंवा वाचू नका परंतु वर्तमानपत्र दररोज वाचा, आपल्या जीवनाला चांगला आकार द्या, असा कडकडीचा संदेश दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग, प्राचार्य वाय. आर. मेश्राम, पोलीस निरीक्षक किरण अवचर उपस्थित होते. यावेळी पाच हजारांच्या वर नागरिक उपस्थित होते. सत्यपाल महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मनोरंजन करीत समाजप्रबोेधन केले. लग्न कुणाशीही करा पण प्रथम शिका, मुलगी दिसायला चांगली नसेल तरी चालेले, परंतु शिकलेली असावी, असे सांगत त्यांनी हुंडा पद्धतीवर प्रहार केला. हागणदारीमुक्तीकडे वळत त्यांनी शाहजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधला, तुम्ही बायकोच्या लज्जेसाठी शौचालय बांधा, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवा, देशाची व आईवडिलांची मान खाली जाईल, असे काम करू नका, भानामती, भूत, देवी या प्रकारांपासून दूर राहा. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चोरून लपून आणली जात असलेली दारू स्त्रियांनी बंद करावी, दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांनी दारूविक्री विरोधात आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन केले.कीर्तनात सत्यपाल महाराजांना गजानन चिंचोलकर, रामचंद्र तांबकर, सुनील कुमार, राजेश काईगे यांनी साथ संगत दिली. मुक्तीपथचे तालुका संघटक दिलीप वखरे, सहसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर, प्रकल्प अधिकारी संतोष सावळकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)