शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

धान्य घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा ; दोघांचे निलंबन, १६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:39 IST

Gadchiroli : २ कोटींच्या वसुलीचे जिल्हाधिकारी पंडा यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तांदूळ खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दणका दिला आहे. तीन प्रकरणांत तब्बल २ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले असून दोघांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. यासोबतच १६ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

धान्य खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा जिल्हा प्रशासनाने यातून दिला आहे. तथापि, २०११ मधील अपहार प्रकरणी अद्याप पूर्ण वसुली झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे इतकी वर्षे त्यांना कोण पाठीशी घालत होते, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

प्रकरण १ : अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले आहे. २२.४२ लाखांची वसुली सुरू आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असून ट्रान्सपोर्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रकरण २ : सिरोंचा येथील २०११ सालच्या धान्य अपहारप्रकरणी २४.८ लाखांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

प्रकरण ३: आदिवासी विकास संस्था, देऊळगाव (ता. कुरखेडा) येथे २०२३-२४ मध्ये ३,९०० क्विंटल तांदळाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून १५३ कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

धान्य साठ्यांची १०० टक्के तपासणीजिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील धान्य साठ्याची १०० टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. २ एप्रिल रोजी झालेल्या पेंडी होर्डिंग कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

१३ राइस मिलर्सच्या मालमत्ता जप्तीचे आदेश२०११ मधील धान्य लोडिंग प्रकरणात लादलेल्या २.६७ कोटी रुपयांच्या दंडापैकी १.३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित ७२ लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या १३ राइस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे.

देऊळगाव संस्थेच्या व्यवस्थापकांचे उपप्रादेशिक व्यवस्थापकांवर गंभीर आरोप

  • कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील १ कोटी ५३ लाख रुपयांच्या बहुचर्चित तांदूळ घोटाळ्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापकांनी संस्थेला नोटीस बजावली.
  • यानंतर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी 3 संस्थेच्या व्यवस्थापकांनी आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक येथील व्यवस्थापकीस संचालकांना ९ एप्रिल रोजी पत्र पाठवून उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
  • उपप्रादेशिक व्यवस्थापकांच्या सांगण्यावरूनच शेतकऱ्यांच्या नावाने धानाचे पैसे काढले असा दावा व्यवस्थापकांनी केला आहे. नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालकांसोबत माझे घरगुती संबंध आहेत, त्यामुळे मी सांगतो तसे तू कर काही होणार नाही, असे म्हणत नोटीसला उत्तरही त्यांनीच लिहिले व माझी दबाव टाकून स्वाक्षरी घेतल्याचा आरोप व्यवस्थापकांनी ठेवला आहे.
  • वरिष्ठांना व संचालकांना पैसे द्यावे लागतात, असे म्हणत धमकावून माझ्याकडून पैशांची वसुली केल्याचा दावादेखील व्यवस्थापकांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांचे पाय खोलात गेले आहेत.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली