शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

खात्याची माहिती कुणालाही देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार सुधाकर देडे यांनी केले.

ठळक मुद्देठाणेदारांचे प्रतिपादन : कुरखेडा पोलीस ठाण्यातर्फे घाटी येथे जनजागरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगार दूर राहून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करतो. बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार सुधाकर देडे यांनी केले.जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने घाटी येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, नायब तहसीलदार, ए.बी.मडावी, सरपंच सोनी तलांडे, उपसरपंच फाल्गुन फुले, माजी पं.स.सदस्य उद्धव गहाणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव ठलाल, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादाजी ब्राम्हणकर, मुख्याध्यापक नारायण बांडे, शिक्षक सुधाकर कोडापे, संदीप टेकाम, गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य पीतांबर ठलाल, नारायण कवाडकर, नेपाल जनबंधू, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन उईके, कमलेश देशमुख, हत्तीरोग निरीक्षक पी.जी.सोरते, वनपाल मनोहर हेपट उपस्थित होते.जनजागरण मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती विभागांद्वारे देण्यात आली. महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सांगण्यात आले. ग्रामीण रोजगार हमी योजना, आम आदमी विमा योजना, निराधार योजना आदींची माहिती दिली. तसेच योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील प्रेमदास पंधरे, संचालन मनोज सोनकुकरा तर आभार त्रिशा गावडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बळीराम पदा, उमेश नेवारे, ललीत जांभुळकर, केवळराम धांडे, रोशन पुराम, लोमेश मेश्राम, देवराव डोंगरे, भगवान तलांडे, गौरीशंकर भैसारे, संगीता चव्हाण, गौरी कुमरे यांनी सहकार्य केले.आंतरजातीय जोडप्याचा विवाहतालुक्यातील खरकाडा येथील महेश दुमाने व साक्षी लांजेवार यांचा आंतरजातीय विवाह सोहळा जनजागरण मेळाव्यात पार पाडण्यात आला. त्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे त्यांना जीवनावश्यक वस्तू आंदण म्हणून देण्यात आल्या. सर्वधर्म समभाव व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी आंतरजातीय विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. तसेच समाजानेही याबाबत जागरूक व्हावे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक