शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीपुलावर वाढला अपघाताचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील वैनगंगा नदीवर दुचाकी ते अवजड वाहनांसाठी बांधण्यात आलेल्या पुलावर दोन स्लॅबच्या दरम्यान मोठ्या स्वरूपात  गडप तयार होऊन मोठ्या खाचा निर्माण झाल्या आहेत. उंचवटे  व  खाच तयार  झाल्याने वाहनांना जबरदस्त झटका बसून वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन  अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे. त्यामुळे ब्रेकरपेक्षाही मोठे झटके वाहनांना बसू लागले आहेत. या गॅपमध्ये वाहनाचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाणही वाढले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गॅप बुजविण्यासाठी डांबर टाकले होते. काही दिवसांनी तेच डांबर वाहनाच्या वर्दळीने वर येऊन त्यांचे उंच कडा व गॅप तयार झाल्याने या पुलावर २८ ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलावर तयार झालेल्या खाचा व उंचवटे अपघातास निमंत्रण देत असून, वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.  पुलावर पडलेला मोठा गॅप  त्वरित बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ग्रामीण भागातील अनेक रस्ते उखडलेदेसाईगंज तालुक्याच्या विसाेरा, कुरूड, काेंढाळा गावातील अंतर्गत रस्ते उखडले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रस्ते व नाल्या बांधकामांवर लाखाे रूपयांचा खर्च केला जाताे. मात्र काम याेग्य हाेत नसल्याने अल्पावधीतच पुन्हा जैसे थे हाेतात. रस्ते कामाबाबत अनेक तक्रारी येऊनही दर्जा सुधारताना दिसून येत नाही. 

 

टॅग्स :riverनदी