शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांशी गैरवर्तन भोवले; वादग्रस्त पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 20:56 IST

Gadchiroli News  चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीच्या धामधुमीत मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर न्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

संजय तिपाले

गडचिरोली: चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीच्या धामधुमीत मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर न्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या ठाण्यात त्यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले, त्याच ठाण्यात त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

  चामोर्शी बाजार समिती निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांचा पॅनल होता. ते स्वत:ही उमेदवार होते. २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्याच पहाटे ठाण्यात बोलावून  लाथाबुक्क्या  व बुटाने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवेंवर केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते.

त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.  मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत २० मे रोजी पो.नि. राजेश खांडवेंवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी पो.नि. खांडवे हे न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले. गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरुन खांडवे यांनी न्या. मेश्राम यांच्याशी हुज्जत घालून गैरवर्तन केले. त्यानंतर खांडवे हे तेथून निघून आले. यानंतर न्या.मेश्राम यांनी ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना कळवली.  चामोर्शी ठाण्याचा तात्पुरता पदभार उपनिरीक्षक सुधीर साठे यांच्याकडे सोपविला आहे.एसपींची तत्परता, बेशिस्तीला दणका...  घडल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने स्वत: खातरजमा केली. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठांना ही बाब कळविली. पो.नि. खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, त्यानंतर त्यांच्याविरुध्द चामोर्शी ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला.  यातून बेशिस्त अधिकाऱ्यांना योग्य तो धडा मिळाला आहे.

टॅग्स :suspensionनिलंबन