शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पºहे करपले, जमिनीला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:18 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा दुष्काळाच्या छायेत : शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. पाऊस पडत नसल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला असून जिल्हाभरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.मृग, रोहिणी व आर्द्रा या तीन नक्षत्रात अपेक्षित पाऊस जिल्ह्यात झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी निम्मा पाऊस पडला. अपेक्षेच्या तुलनेत पावसाची सरासरी फारच कमी आहे. त्यामुळे तलाव, बोड्या तसेच नदी, नाल्यांमध्ये फारसा पाणीसाठा उपलब्ध नाही. मानापूर, देलनवाडी, वैरागड भागासह देसाईगंज, कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अशाच प्रकारची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे रोवणीयोग्य झाले, असे शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने शेतजमिनीला पाणी पुरवठा करून रोवणीचे काम हाती घेतले आहे. तसेच काही शेतकरी धान पºह्यांना वाचविण्याची सातत्याने धडपड करीत आहेत. काही शेतकºयांनी शेत जमिनीत पाणी पाहून रोवणी करण्यासाठी पऱ्हे खोदून पेंड्या बांधले. मात्र दुसऱ्यांच दिवशी शेतजमिनीतील पाणी आटल्याने खोदलेल्या पेंड्या तशाच कायम आहेत. एकूणच पावसाअभावी जिल्ह्यातील धान पऱ्हे करपले असून रोवणीचे काम खोळंबले आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. जवळपास पावणेदोन लाख हेक्टरवर दरवर्षी धान पिकाची लागवड रोवणी व आवत्या स्वरूपात होत असते.यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला मुसळधार पाऊस बरसला नाही. मृग व रोहिणी हे दोन नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीला चार दिवस दमदार पाऊस बरसला. या पावसानंतर काही शेतकºयांनी लगबगीने धानाचे पऱ्हे टाकले. तर काहिंनी रोवणीचे काम सुरू केले. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.मानापूर भागात गंभीर स्थितीपावसाळ्याचे दिवस असून सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असून पावसाचा पत्ता नाही. वरूण राजाची वक्रदृष्टी दिसून येत असल्याने मानापूर, देलनवाडी, तुलतुली भागातील धानपीक हंगाम धोक्यात आला आहे. शेतजमिनीतील पऱ्हे पावसाअभावी करपले असून धानाची रोवणी केलेल्या जमिनीला भेगा पडत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बि-बियाण्यांची व्यवस्था केली. नांगरणी करून रोवणीची तयारी केली. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या भागात पीक परिस्थिती गंभीर आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती