शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

९५ च्या वर शाळांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:15 IST

कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या मराठी माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषीत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, ....

ठळक मुद्देअपेक्षाभंग : केवळ दोन कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी पात्र घोषित

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या मराठी माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषीत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली होती. यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला. पण जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना न्याय मिळाला नाही. अनुदानासाठी जिल्ह्यातील केवळ दोन कनिष्ठ महाविद्यालयांना पात्र घोषीत करण्यात आले. राज्य शासनाने जिल्ह्यातील ९५ वर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक व कर्मचाºयांचा अपेक्षा भंग झाला आहे.जिल्ह्यात एकूण १६५ उच्च माध्यमिक शाळा आहेत. यापैकी ५६ अनुदानित, जि.प.चे सहा कनिष्ठ महाविद्यालये, चार स्वयअर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक शाळा आहेत. जवळपास ९९ उच्च माध्यमिक शाळा विनाअनुदान तत्वावर सुरू आहेत. या ९९ उच्च माध्यमिक शाळांमध्ये ५०० वर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विनावेतनावर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. राज्य सरकारकडून आज ना उद्या शाळेला अनुदान प्राप्त होऊन वेतन मिळेल, या आशेने चाळीशी ओलांडलेले शिक्षकही कार्यरत आहेत. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. आता शासनाने जीआर काढून राज्यभरातील एकूण कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १४६ वर्ग व तुकड्यांना अनुदानासाठी पात्र घोषीत केले आहेत. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये देसाईगंज येथील कुथे पाटील कला व विज्ञान महाविद्यालय व अमिर्झा येथील उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे.चार जिल्ह्यावर सरकारची मेहरबानी२८ फेब्रुवारी २०१८ च्या जीआरनुसार विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील १८, जालना जिल्ह्यातील १४ वर्ग व तुकड्यांना अनुदानासाठी पात्र घोषीत केले आहे. अकोला जिल्ह्यातील ११, गोंदिया जिल्ह्यातील १४ शाळांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील एक ते चार शाळांना पात्र घोषीत केले आहे. इतर जिल्ह्यांवर शासनाकडून प्रचंड अन्याय झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा