शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी आगारातील एसटी बसच्या ९५ टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:08 IST

वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : अहेरी आगारात एसटी कर्मचाºयांचा बेमुदत अघोषित संप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/अहेरी : वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला. दिवसभर या आगारातील ९५ टक्के बसफेऱ्या रद्द झाल्या. गडचिरोली आगारातील बसफेऱ्या मात्र दिवसभर सुरू होत्या.राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या कामगार कराराची घोषणा राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी अलिकडेच केली. मात्र हा करार काही एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने अचानक शुक्रवारी रात्री एसटी कर्मचाऱ्यांच्या काही कामगार संघटनांनी संप पुकारला. अहेरी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच संपात सहभाग घेतल्याने या आगारातील बसफेऱ्या प्रभावित झाल्या. अहेरी आगारातून दिरदिवशी ९५ बसफेऱ्या जातात. मात्र शुक्रवारी केवळ सहा बसफेऱ्या गेल्या.अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाबाहेर बैठे आंदोलन केले. दरम्यान शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजीही केली. अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे हाल झाले. त्यांना बराच वेळ बसेसची प्रतीक्षा करावी लागली.गडचिरोली आगारातील बससेवा मात्र सकाळपासून दिवसभर सुरू होती. गडचिरोली आगारातून दरदिवशी १७७ बसफेऱ्या सोडल्या जातात. त्यापैकी १७० बसफेऱ्या सुटल्या. गडचिरोली आगारात या संपाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्याचबरोबर गडचिरोली आगारातील एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही.एसटी व्यवस्थापनाने संप ठरविला बेकायदेशीरएसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्यापूर्वी कोणतीही नोटीस एसटी व्यवस्थापनाला दिली नव्हती. त्यामुळे सदर संप नसून ती कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा होती, असे एसटी प्रशासन माणून सदर संप अवैध घोषित केला आहे. या संपात सहभागी झालेल्या अहेरी आगारातील ४५ व ब्रह्मपुरी आगारातील ३५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दोन्ही आगारातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई विभाग नियंत्रक यांनी केली आहे. राज्यभरात ज्या आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, त्या आगारातील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. निलंबनाची कारवाई झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारपासून कर्मचारी कामावर परतण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप