शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

दुचाकीने गावात पोहोचून गरोदर महिलेवर केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

दोड्डुर गाव गट्टा येथून अंदाजे २० कि.मी. अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पावसाळ्यात जात नाही. तरीही डाॅ. वड्डे यांनी एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दुचाकीने चिखलमय रस्त्याने वाट काढत दोड्डुर गाव गाठले आणि जिजावर उपचार सुरू केले. पाऊस कमी झाल्यानंतर तिला शुक्रवारी काही किलोमीटर दुचाकीने आणि नंतर रुग्णवाहिकेने आणून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले.

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : त्या गरोदर महिलेच्या पोटातील गर्भाने ९ महिने पूर्ण केले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रसवकळा येण्याची शक्यता होती. त्यातच ती मलेरियाने ग्रस्त झाली. तिची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आणि गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने भर पावसात चिखलाच्या वाटेने दुचाकी चालवीत त्या महिलेचे गाव गाठले. तिच्यावर तेथेच उपचार केले. एवढेच नाही तर तिला एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात आणून भरती केले.एका महिलेवर उपचारासाठी अशी धडपड करून वैद्यकीय सेवेसाठी आदर्श निर्माण करणारे ते डॉक्टर आहेत नितेश वड्डे. प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा अंतर्गत येत असलेल्या दोड्डुर (टोला) येथील जिजा अजय कोरसा (२० वर्षे) या गर्भवतीचे ९ महिने भरले होते. त्यातच ती मलेरिया पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिची प्रकृती बुधवारी अधिकच बिघडल्याची माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन कन्नाके यांना मिळाली. त्यांनी ही माहिती गट्टाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितेश वड्डे यांना दिली. डॉ. वड्डे यांनी पावसाची तमा न बाळगता दुचाकीने तिचे गाव गाठून उपचार केले.पावसाच्या दिवसात तालुक्यात अनेक गावांत नदी, नाले तसेच रस्त्याअभावी रुग्णवाहिका किंवा दुचाकी वाहनानेही जाणे कठीण असते. नदीतून नावेने किंवा पाण्यातून पायी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी दुर्गम भागात सेवा देत आहेत.

२० किलोमीटरचे अंतर, चिखलमय रस्ता-    दोड्डुर गाव गट्टा येथून अंदाजे २० कि.मी. अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पावसाळ्यात जात नाही. तरीही डाॅ. वड्डे यांनी एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दुचाकीने चिखलमय रस्त्याने वाट काढत दोड्डुर गाव गाठले आणि जिजावर उपचार सुरू केले. पाऊस कमी झाल्यानंतर तिला शुक्रवारी काही किलोमीटर दुचाकीने आणि नंतर रुग्णवाहिकेने आणून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य