शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

गाेदावरी नदीच्या महापुराने ताेडला 1986 चा रेकाॅर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ व १६ जुलै राेजी पावसाचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा १७ जुलैपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस काेसळत आहे. वैनगंगा व तिच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी झाली असल्याने पूर परिस्थिती ओसरली असली तरी दक्षिणेकडील गाेदावरी नदीला पूर आला आहे. प्राणहिता नदी ओसंडून वाहत आहे. सिराेंचा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : सिराेंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गाेदावरी नदीला महापूर आला आहे. गाेदावरी नदीपात्रातील कालेश्वरम या ठिकाणी असलेल्या सरिता मापन केंद्रावर १९८६ मध्ये १०७.०५ मीटर एवढी महत्तम पाणी पातळीची नाेंद झाली हाेती. मात्र १७ जुलै राेजी ही मर्यादा ओलांडत या ठिकाणी १०८.१८ मीटर पाणी पातळीची नाेंद झाली. मात्र काही वेळातच पाणी पातळी कमी हाेऊन रविवारी सकाळी ११ वाजता ती १०३ मीटरवर पाेहाेचली. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ व १६ जुलै राेजी पावसाचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा १७ जुलैपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस काेसळत आहे. वैनगंगा व तिच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी झाली असल्याने पूर परिस्थिती ओसरली असली तरी दक्षिणेकडील गाेदावरी नदीला पूर आला आहे. प्राणहिता नदी ओसंडून वाहत आहे. सिराेंचा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

 भामरागडात शिरले पर्लकाेटाच्या पुराचे पाणी पर्लकाेटा नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याने पर्लकाेटा नदीचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. शेकडाे घरे पुन्हा पाण्याखाली आली आहेत. पर्लकाेटा नदीपुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. सततच्या पुरामुळे या तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

सिराेंचाला पुराचा विळखा कायममागील तीन दिवसांपासून गाेदावरी, प्राणहिता नद्यांना पूर आला आहे. याचा फटका सिराेंचा तालुक्यातील गावांना बसला आहे. अहेरी तालुक्यातील गाेलाकर्जी, नागेपल्ली, प्रभूसदन, सिराेंचा तालुक्यातील सिराेंचा माल, सिराेंचा रै, रामकृष्णापूर, आयपेठा, तुमनूर माल, वडधम, आसरअल्ली, अंकिसा येथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले हाेते. ही कुटुंबे अजूनही सुरक्षित स्थळीच आहेत. 

संजय सराेवर व गाेसेखुर्दमुळे वैनगंगा फुगली-    मध्यप्रदेशातील संजय सराेवराचे सर्वच १० दरवाजे उघडले आहेत. तसेच गाेसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. या धरणातून १.०६ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू  आहे. -    नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १५ पेक्षा अधिक मार्ग रविवारीही हाेते बंद

चामाेर्शी ते गडचिराेली मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने हा मार्ग बंद आहे. अहेरी-बेजूरपल्ली-पर्सेवाडा येथील पाेचमार्ग वाहून गेल्याने हा मार्ग बंद आहे. आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गावर तुमरगुडा नाल्यावरून पाणी वाहत आहे. आलापल्ली-सिराेंचा मार्ग हलक्या वाहनांकरीता सुरू आहे. बाेमरपल्ली ते नेमडा मार्गावरील रपटे वाहून गेल्याने हा मार्ग बंद आहे. सिराेंचा तालुक्यातील झेंडा, दर्सेवाडा, बाेंड्रा, माेयाबिनपेठा, विठ्ठलराव पेठा, पर्सेवाडा, विठ्ठलराव चेक, सिकेला, रेगुंठा, टेकडा हे मार्ग बंद आहेत. पर्सेवाडा, चिकेला- जाफ्राबाद या मार्गावरील रपटा वाहून गेला आहे. देवलमरी-अहेरी मार्गावरील नाल्यावर पाणी साचले आहे. उमानूर-मरपल्ली मार्गावरील ॲप्राेच रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग बंद आहे. भामरागड-लाहेरी- बिनागुंडा हा मार्ग बंद आहे. आलापल्ली-आष्टीदरम्यानच्या दिना नदीपुलावरून पाणी वाहत आहे. निजामाबाद-सिराेंचा-जगदलपूर ह राष्ट्रीय महामार्ग साेमनपल्ली जवळच्या पाेचमार्गावरून पाणी वाहत असल्याने बंद आहे. सिराेंचा नगरम मार्ग बंद आहे. सिराेंचा-कालेश्वर, झिंगानूर-सिरकाेंडा मार्ग बंद आहे. आष्टी ते चंद्रपूर मार्गावरील आष्टी पुलावरील पाणी ओसरले आहे. मात्र रस्ता क्षतिग्रस्त असल्याने जड वाहनांकरिता बंद आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर