शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला

By संजय तिपाले | Updated: July 19, 2024 12:40 IST

सुविधांअभावी परवड : आलापल्ली - भामरागड महामार्गावरील धक्कादायक प्रकार

गडचिरोली : पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून एका गर्भवती महिलेला पैलतिरी जाण्याची वेळ आली. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आलापल्ली- भामरागड महामार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागात सुविधांअभावी नागरिकांच्या नशिबी परवड कायम असल्याचे समोर आले आहे.

जेवरी संदीप मडावी (२२,रा. कुडकेली ता.भामरागड) असे महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती. मात्र, १९ जुलैलाच सकाळी प्रसववेदना सुरु झाल्या. त्यामुळे सुमदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या. वाटेत मोठा नाला लागला. १८ रोजी जोरदार पाऊस झालेला असल्याने या नाल्यातून पाणी वाहत होते, त्यामुळे रहदारी अशक्य होती. रुग्णवाहिका पुढे नेता येत नसल्याने शेवटी जेसीबीच्या खोऱ्यात महिला व तिच्या पतीला बसवून पैलतिरी सोडण्यात आले. आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे (क्र.१३० डी) सध्या बांधकाम सुरु आहे. या नाल्यावर बांधकामासाठी जेसीबी होता, त्यात बसून नाला ओलांडल्यानंतर जेवरी मडावीला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

काम धीम्या गतीने, जाब कोण विचारणार ?आलापल्ली ते भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग दक्षिण गडचिरोलीतील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.   रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने व तात्पुरते मार्ग मुसळधारपावसाने वाहून गेल्याने नागरिकांचे हाल सुरु आहेत. त्यातच गर्भवती महिलेलाही याचा फटका बसला. धीम्या गतीने सुरु असलेले काम, पर्यायी पूल वाहून गेल्याने वारंवार तुटत असलेला संपर्क यामुळे कंत्राटदाराला जाब विचारणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

"दुर्गम, अतिदुर्गम भागातील गर्भवतींसाठी ट्रॅकिंग सिस्टीम आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेला आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. या महिलेस प्रसव वेदना सुरु झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात हलविले, पण नाल्याला पाणी असल्याने जेसीबीच्या खोऱ्यात बसवून पैलतिरी न्यावे लागले. सध्या उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे."- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाGadchiroliगडचिरोली