शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षल नेता चकमकीत ठार

By संजय तिपाले | Updated: June 5, 2025 17:06 IST

छत्तीसगडमध्ये धुमश्चक्री : सहा राज्यांत होती दहशत

गडचिरोली :  महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडमधील अनेक हिंसक माओवादी कारवायांचा सूत्रधार जहाल नेता आणि केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर (६९) याचा खात्मा करण्यात ५ जून रोजी जवानांना यश आले. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुधाकरवर सहा राज्यांत मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते.

छत्तीसगडच्याबिजापूर येथे  राष्ट्रीय उद्यान परिसरात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता. या चकमकीत केंद्रीय समिती सदस्य सुधाकर यास कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. दरम्यान, सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू असून घटनास्थळी आणखी काही मृतदेह आढळून येतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. चकमकीत नक्षलवादी केंद्रीय समिती नरसिंहचलम उर्फ ​​सुधाकर हा नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता मानला जात असे. तो अनेक मोठ्या नक्षलवादी घटनांमध्ये सहभागी होता. सहा राज्यांसाठी तो मोस्ट वॉन्टेड होता. छत्तीसगडच्या अबुझमाड भागात झालेल्या चकमकीत जवानांनी १ कोटी रुपयांचा सर्वोच्च नक्षलवादी नेता व प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ  बसवा राजू ऊर्फ गगन्ना ऊर्फ प्रकाश यास २१ मे रोजी ठार केले होते. 

बसवा राजूनंतर सुधाकरचा खात्मा २०१८ मध्ये नक्षलवादी नेता गणपतीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बसवा राजूने त्याची जागा घेतली. बसवा राजूच्या मृत्यूनंतर उरलेल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी सुधाकर हा एक होता. त्याचा खात्मा करण्यात यश आल्याने माओवादी चळवळीला हा मोठा हादरा मानला जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी