शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

वाहन व बांबू जाळपोळीत ९९ लाखांचे नुकसान

By admin | Updated: April 15, 2017 01:27 IST

मक्केपल्ली उपक्षेत्रातील कोठरी नियत क्षेत्रात बांबूची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बांबू डेपोला १२ एप्रिल रोजी नक्षल्यांनी आग लावली.

पोलिसांत तक्रार दाखल : कोठारी वन परिक्षेत्रातील घटना घोट : मक्केपल्ली उपक्षेत्रातील कोठरी नियत क्षेत्रात बांबूची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बांबू डेपोला १२ एप्रिल रोजी नक्षल्यांनी आग लावली. या आगीत एकूण ९८ लाख ६१ हजार २३४ रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे वन विभागाने केलेल्या पंचनाम्यानंतर दिसून आले आहे. कोठरी जंगलात २६ फेब्रुवारीपासून बांबू कटाईचे काम सुरू करण्यात आले होते. दोन शासकीय ट्रक, तीन खासगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कटाई केलेल्या बांबूची डेपोवर वाहतूक केली जात होती. १२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कोटरीपासून पाच किमी अंतरावर दोन डोगंरांच्या मध्यभागी असलेल्या जंगलात २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी दोन ट्रक व दोन ट्रॅक्टरला आग लावली. याबाबतची माहिती ट्रक ड्रायव्हर शेख हैदर शेख यांनी वन परिक्षेत्र कार्यालय घोट येथे दिली. या जाळपोळीत एमएच ३४ एबी ५८६४ व एमएच ३४ एबी ६००३ क्रमांकाचे प्रत्येकी १४ लाख २७ हजार ५०० रूपये किमतीचे दोन शासकीय ट्रक जळाले आहेत. या दोन ट्रकची किमत २८ लाख ५५ हजार रूपये होते. या ट्रकमध्ये भरून असलेल्या ४ हजार ८५० रूपयांचा बांबूही जळून खाक झाला आहे. एमएच ३४ एपी १७३७ क्रमांकाचे ट्रॅक्टर व त्यामधील १ हजार १०० बांबू, एमएच ३४ एल ८१७१ क्रमांकाचा ट्रॅक्टर व त्यामधील १ हजार १०० बांबू असे एकूण दोन ट्रॅक्टरमधील ७ हजार ५० रूपये किमतीचे बांबू व २ लाख ६७ हजार ९०० रूपये किमतीचे ट्रॅक्टर जळाले आहेत. या सर्व मालाची किमत ४४ लाख ७६ हजार ५०० रूपये होते. एमएच ३३ एफ १७२९ क्रमांकाची ट्रॅक्टर जंगलात पंक्चर अवस्थेत उभी होती. याही ट्रॅक्टरला नक्षल्यांनी आग लावली. या ट्रॅक्टरची अंदाजे किमत ६ लाख ७६ हजार ८०० रूपये एवढी होते. ट्रॅक्टरमध्ये भरलेले १५० नग बांबूची किमत ४३ हजार ५०० रूपये एवढी होते. बांबू व ट्रॅक्टरही जळाला आहे. याबाबतची तक्रार वनपाल मोरेश्वर नानाजी कुद्रवार यांनी पोलीस मदत केंद्र घोट येथे दाखल केली आहे. (वार्ताहर) चार बांबू डेपोला आग ट्रॅक्टर व ट्रकची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी बांबू डेपोलाही आग लावली. डेपो क्रमांक १ मध्ये १८ हजार १० नगर बांबू, डेपो क्रमांक २ मध्ये ८८ हजार ७५०, डेपो क्रमांक ३ मध्ये ९ हजार ९३३ व डपो क्रमांक ४ मध्ये ६ हजार ५० असे एकूण १ लाख २२ हजार ७४२ नग बांबू ठेवला होता. याची किमत ४६ लाख ६४ हजार २३४ रूपये एवढी होते. सदर बांबू जळून खाक झाला आहे.