शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडा यात्रेसाठी ९९ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 01:50 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे.

नियोजन पूर्ण : यात्रेकरूंचे जत्थे दाखल लोमेश बुरांडे/संतोष सुरपाम   चामोर्शी/मार्र्कंडादेव विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगाराने बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. गडचिरोली, अहेरीसह चंद्रपूर, अहेरी, ब्रह्मपुरी, राजूरा, चिमूर, वरोरा या सर्व आगाराच्या मिळून एकूण ९९ बसगाड्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी सोडण्यात येणार आहे. सदर यात्रेला २४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. यात्रा जवळ येऊ लागली असल्याने दुकानदार व यात्रेकरूंचे जत्थे मार्र्कंडादेव येथे दाखल होत आहे. यात्रेदरम्यान व्यवसाय करण्यासाठी आकाश पाळणे, मिनाबाजार, खेळणीची दुकाने, हॉटेल, घरगुती भांडे व इतर साहित्याचे दुकान, जादूचे खेळ, मौत का कुआ, पुजेच्या साहित्याचे दुकान १५ ते २० दिवस येथे राहतात. मनोरंजनासाठी अनेक खेळाचे प्रयोगही येथे दाखविले जातात. त्यामुळे व्यावसायिक साहित्यासह मार्कंडादेव येथे दाखल होऊन दुकान थाटत आहेत. एसटीचे विभाग नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे, विभागीय वाहतूक अधिकारी एन. एस. बेलसरे यांच्या मार्गदर्शनात आगार व्यवस्थापक व्ही. एल. बावणे, बसस्थानक प्रमुख पी. एस. सालोटकर, एस. ए. चौधरी बसफेऱ्यांचे व्यवस्थापन सांभाळणार आहेत.