शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आलापल्लीत ९७ रक्तदात्यांचे रक्तदान

By admin | Updated: October 2, 2016 01:59 IST

जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

दीपक आत्राम यांची उपस्थिती : नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचा पुढाकारआलापल्ली : जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ९७ रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. या शिबिराचे उद्घाटन माजी आ. दीपक आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. बाला, वनपरिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार, एच. जी. मडावी, प्रभाकर आत्राम, टी. चंद्रशेखर, नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचे अध्यक्ष विजय खरवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, नगरसेविका वर्षा ठाकरे, कोमटी समाज संघटनेचे अध्यक्ष साईबाबा भटपल्लीवार, पोलीस उपनिरीक्षक सी. एल. कोेटेकर, व्यापारी संघटनेचे दिलीप बिरेल्लीवार, मुनेश्वर हडपे, व्यंकटेश मद्देर्लावार, मुरली परकीवार, महेश मुक्कावार, गजानन रामटेके, मंगेश परसावार, अभियंता मुके, बाबुराव मद्देर्लावार, देवेंद्र वासेकर आदी उपस्थित होते.रक्तदात्यांनी दिलेले रक्त गरजू रूग्णांना तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे, तसेच नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करावे, असे माजी आ. दीपक आत्राम यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ठाणेदार संजय मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, जि. प. सभापती अजय ंकंकडालवार यांनीही मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. अनुपमा बिश्वास, कर्मचारी सरिता वाघ, शिरीन कुरेशी, प्रीती आत्राम, निर्मला जक्कावार, शुभांगी वाडके, शरद बांबोळे, गोपाल महतो, मेहराज शेख तसेच नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचे किशोर सहारे, संजय खरवडे, आदित्य खरवडे, दिगांबर खतवार, अनिकेत खरवडे, नितीन खरवडे, गौरव लुथडे, सरस्वती घुमडे, आरती सरोते, छाया लुथडे, वासेकर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय खरवडे, संचालन संतोष पडालवार यांनी केले तर आभार पिदुरकर यांनी मानले. (वार्ताहर)