शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

94 टक्के काेराेनारुग्ण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

मार्च महिन्यापासूनच राज्यभरात काेराेनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली हाेती. मात्र राज्यात सर्वात शेवटी म्हणजे १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी एकाच वेळी पाच रूग्ण आढळले होते. त्यातील चार रूग्ण कुरखेडा तालुक्यातील व एक रूग्ण चामाेर्शी तालुक्यातील हाेता. जिल्हाधिकाऱ्यांनी काेराेनाचा रूग्ण आढळून आल्याचे जाहीर करताच सामाजिक माध्यमांवर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

ठळक मुद्देसात महिन्यांपूर्वी आढळहा पहिला रुग्ण : आतापर्यंत ८,०२० रूग्ण काेराेनामुक्त

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना रूग्णांची संख्या वाढत चालली असली तरी बरे हाेणाऱ्या रूग्णांची संख्यासुध्दा वाढत आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ९४ टक्के रूग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यास ७ महिने पूर्ण होत आहेत. तेव्हाची आणि आताची परिस्थिती पाहता बराच फरक पडला असून कोरोनाशी जुळवून घेत लोक व्यवहार करू लागले आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यभरात काेराेनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली हाेती. मात्र राज्यात सर्वात शेवटी म्हणजे १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी एकाच वेळी पाच रूग्ण आढळले होते. त्यातील चार रूग्ण कुरखेडा तालुक्यातील व एक रूग्ण चामाेर्शी तालुक्यातील हाेता. जिल्हाधिकाऱ्यांनी काेराेनाचा रूग्ण आढळून आल्याचे जाहीर करताच सामाजिक माध्यमांवर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाॅझिटीव्ह आढळलेले रूग्ण कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा व चिचेवाडा येथील असल्याने ही दाेन्ही गावे प्रशासनाने सील केली हाेती. पाॅझिटीव्ह आढळलेले रूग्ण मुंबई येथून परतले हाेते. कुरखेडा येथील एका टॅक्सी चालकाने त्यांना साेडून दिले. ताे टॅक्सी चालक ज्या गांधी वार्डात वास्तव्यास हाेता ताे परिसर १४ दिवसांसाठी प्रतिबंधीत क्षेत्र घाेषित करून सील करण्यात आला. पाेलिसांचा खडापहारा ठेवला हाेता. यावरून प्रशासन व नागरिकांमध्ये काेराेनाची किती दहशत हाेती, याचा अंदाज येतो. आता मात्र काेराेना रूग्णांची संख्या बरीच जास्त आहे. दरदिवशी जवळपास ५० रूग्ण आढळून येतात. तरीही काही नागरिक बिनधास्त फिरतात. यावरून काेराेनाविषयी पूर्वी असलेली भिती कमी झाली असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काेराेना एकूण रूग्णांची संख्या ८ हजार ५०५ वर पाेहाेचली आहे. त्यापैकी ८ हजार २० रूग्ण काेराेनापासून मुक्त हाेऊन घरी परतले असून ते सर्वजण ठणठणीत आहेत.

चार दिवसानंतर आला पाॅझिटीव्ह अहवालसुरूवातीच्या कालावधीत केवळ आरटीपसीआर टेस्ट केल्या जात हाेत्या. या टेस्ट नागपूर येथे पाठविल्या जात हाेत्या. त्यामुळे चार ते पाच दिवस टेस्टचा अहवाल प्राप्त हाेत नव्हता. कुरखेडा येथील रूग्णांचा अहवाल चार दिवसानंतर प्राप्त झाला. अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे कळताच रूग्णांमध्ये एकदम भितीचे वातावरण निर्माण झाले.

रूग्ण नसतानाही घेतली जात हाेती काळजी देशभरात लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर जवळपास दाेन महिन्यानंतर जिल्ह्यात पहिलला रूग्ण आढळून आला. ज्यावेळी जिल्ह्यात एकही रूग्ण नव्हता. त्यावेळी आताच्या तुलनेत नागरिक जास्त काळजी घेत हाेते. गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळत हाेते. बाहेर निघताना तर हमखास मास्क घालत हाेते. आता मात्र हे नियम पाळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या