शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

९० बॉक्स काळा गूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:51 IST

येथील एका किराणा दुकानाच्या गोडाऊनमध्ये ९० पेट्या काळा गूळ रात्रीच्या सुमारास उतरविण्यात आल्याची गुप्त माहिती कळताच आष्टी पोलिसांनी गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास पंचासमक्ष कटरच्या सहाय्याने गोडाऊनचे कुलूप तोडून तेथून काळा गूळ भरलेले ९० बॉक्स जप्त केल्याची कारवाई केली.

ठळक मुद्देआरोपीला अटक : आष्टी पोलिसांची कारवाई, चारचाकी वाहन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील एका किराणा दुकानाच्या गोडाऊनमध्ये ९० पेट्या काळा गूळ रात्रीच्या सुमारास उतरविण्यात आल्याची गुप्त माहिती कळताच आष्टी पोलिसांनी गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास पंचासमक्ष कटरच्या सहाय्याने गोडाऊनचे कुलूप तोडून तेथून काळा गूळ भरलेले ९० बॉक्स जप्त केल्याची कारवाई केली.टाकलेल्या धाडीदरम्यान पोलिसांना गोडाऊनमध्ये खरड्याचे ९० बॉक्स आढळून आले. या गुळाची किंमत ७४ हजार २५० रूपये आहे. या गुळाची वाहतूक करण्यासाठी एमएच-३४-बीजी-०८८६ क्रमांकाचे चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. ९० बॉक्स गूळ व चारचाकी वाहन मिळून एकूण ७ लाख ७४ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त केला. यातील आरोपी दुकानदार सोनल विलास बोनगिरवार रा. करंजी ता. गोंडपिपरी व चालक लाभासिंग गुरूमिताश्री रंधवा (२५) रा. आष्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाडे, समू चौधरी, पोलीस हवालदार संघरक्षित फुलझेले, नरेश भसारकर, मिलींद एलावार, गाजनन डेंगरे, बाजीराव उसेंडी, मुनेश्वर रात्रे, विनोद गौरकार आदींनी केली.सदर गूळ जप्ती प्रकरणातील आरोपी सोनल बोनगिरवार फरार झालेला आहे. आष्टी पोलीस त्याच्या मागावर असून या प्रकरणाचा कसून तपास ठाणेदारांच्या नेतृत्वात करीत आहेत.