शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

९७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: August 7, 2016 01:36 IST

विविध राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २२ हजार ९८ शेतकऱ्यांना

उद्दिष्टाच्या ५१ टक्के : जिल्ह्यातील २२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ गडचिरोली : विविध राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २२ हजार ९८ शेतकऱ्यांना ९६ कोटी ७३ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यावर्षी खरीप हंगामात १८८ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टाच्या निम्मेच कर्ज वितरित झाले आहे. वाढत्या महागाईबरोबरच तसेच शेतीतील अत्याधुनिक साधनांबरोबरच शेतीचा खर्च वाढत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर धानाचे उत्पादन घेतले जाते. धानासाठी चांगले बियाणे, ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखणी आदी कामे केली जातात. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्चही वाढला आहे. हा सर्व खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी मागेल त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या क्षेत्राप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने बँकांना दिले आहेत. चालू खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना १८८ कोटी १ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९६ कोटी ७३ लाख रूपयांचेच कर्ज वितरण झाले आहे. बँकांना जेवढे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्याच्या निम्मेच कर्ज वितरण केले जाते. हा दरवर्षीचाच अनुभव आहे. याचाच कित्ता राष्ट्रीयकृत बँकांनी यावर्षीसुध्दा गिरविला आहे. काही बँकांनी उद्दिष्टाच्या २० टक्क्यांपेक्षाही कमी कर्जाचे वितरण केले आहे. (नगर प्रतिनिधी) जनजागृतीसाठी मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना कर्जाची मिळाली माहिती कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने बँकांना दिले होते. त्यानुसार यावर्षी बँकांनी मोठ्या गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन केले. त्याचबरोबर महसूल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यांमध्ये बँक कर्मचारी उपस्थित राहून त्यांना कर्ज घेण्याविषयी आवाहन करीत होते. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी चालू खरीप हंगामात ९६ कोटी ६३ लाख रूपयांचे कर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४३ कोटी २१ लाख रूपये कर्ज वितरित केले आहे. या बँकेला ५३ कोटी रूपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टाच्या ८२ टक्के कर्ज वितरित केले आहे. सर्वाधिक कर्ज वितरण याच बँकेतर्फे केले जाते. यावर्षीसुध्दा कर्ज वितरणात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली आहे. गतवर्षी सुध्दा या बँकेने जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप केले होते, हे विशेष.