शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

तज्ज्ञांअभावी ९५१ रूग्ण रेफर

By admin | Updated: July 1, 2014 23:30 IST

गरिबांसह इतर नागरिकांना उपचार घेता यावे म्हणून सरकारी रूग्णालय निर्माण करण्यात आले असले तरी सरकारी रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत नाही.

आरमोरी : गरिबांसह इतर नागरिकांना उपचार घेता यावे म्हणून सरकारी रूग्णालय निर्माण करण्यात आले असले तरी सरकारी रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत नाही. आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून २०१३-१४ या वर्षात विविध प्रकारच्या आजारांचे ९५१ रूग्ण तज्ज्ञाअभावी दुसऱ्या रूग्णालयात रेफर करण्यात आले आहेत. त्यामुळे आरमोरी उपजिल्हा रूग्णालय केवळ नावालाच असल्याचे चित्र दिसून येत आहे. आरमोरी उपजिल्हा रूग्णालय वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आले आहे. जन्मत: बाळ दगावणे, योग्य उपचाराचा अभाव, डॉक्टरांचे रूग्णांच्या नातेवाईकास गैरव्यवहार आदी प्रकरणांचा यात समावेश आहे. उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग, वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ, बधीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिषक, वैद्यकीय बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ अशी अनेक पदे आहेत. मात्र रूग्णांना आकस्मिक वेळेत योग्य उपचार मिळत नसल्याने रूग्णालयातील सर्व पदे केवळ नाममात्र असल्याचे उघड झाले आहे. रूग्णालयातील सर्व पदे तज्ज्ञ डॉक्टरांची असून केवळ एमबीबीएस डॉक्टरांची पदे भरण्यात आली आहेत. अधिक आजार असलेले रूग्ण, गरोदर स्त्री, अपघात रूग्ण यांना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. मात्र रूग्णालयात रोग, शस्त्रक्रिया, प्रसूती या करिता तज्ज्ञ डॉक्टर नाही. रूग्णालयात गंभीर आजाराचा अथवा आकस्मिक रूग्ण आल्यास रूग्णांना दुसऱ्या दवाखान्यात रेफर केले जाते. परंतु रूग्णांची देखभाल दवाखान्यात केली जाते. परिणामी अनेक रूग्ण दुसऱ्या रूग्णालयात रेफर करीत असतांना दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत शासनाने रूग्णालयातील अनेक पदे तज्ज्ञ डॉक्टरांसाठी राखीव ठेवली आहेत. मात्र कोणताही तज्ज्ञ डॉक्टर शासकीय रूग्णालयात नोकरी करण्यास तयार नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सदर पदे भरण्याकरिता केवळ एमबीबीएस डॉक्टरांची निवड करून तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरली जात आहेत. यात एमबीबीएस डॉक्टर हे शैक्षणिक प्रॅक्टीस करण्याकरिता रूग्णालयात नियुक्त केले जातात. मात्र त्यांना तज्ज्ञाचा दर्जा देऊन रिक्त जागा भरली जाते. हे उघड झाले आहे. अधिक गंभीर स्वरूपाचे रूग्ण रूग्णालयातून रेफर करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो असे डॉ. वाय. जी. मोरे यांचे म्हणणे आहे. २०१३-१४ या वर्षात गरोदर स्त्री रूग्ण २६४, १९ नवजात बालक (गंभीर) लहान मुले ४५ व इतर ६२३ रूग्ण असे एकूण ९५१ रूग्ण तज्ज्ञ डॉक्टरांअभावी दुसऱ्या रूग्णालयात रेफर करण्यात आलेले आहेत. तसेच ४५ हजार ८२५ बाह्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४ हजार ४०४ रूग्णांना रूग्णालयात भरती करण्यात आले. ३६४ स्त्रियांची प्रसूती व १२ स्त्रियांची सिझरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. (प्रतिनिधी)