शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विविध गावांमध्ये ८७२ विद्युत जोडणी

By admin | Updated: June 23, 2014 00:05 IST

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे आयोजित केले. सन २०१२ यावर्षी मेळाव्याच्या माध्यमातून विविध गावात

गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे आयोजित केले. सन २०१२ यावर्षी मेळाव्याच्या माध्यमातून विविध गावात ११५ व २०१३ मध्ये ७५७ असे एकूण ८७२ नवीन विद्युत लाईन जोडण्यात आल्या. मेळाव्याच्या माध्यमातून आत्मसमर्पण योजनेला बळकटी मिळाली आहे.सन २०१३ या वर्षात एकूण २०१ जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले. त्यात सामूहिक विवाह योजनेत ६६ जोडप्यांचे शुभमंगल झाले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन २५ हजार २४७ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तंटामुक्त झालेल्या १६ गावांना ९३ लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. १७ हजार २७६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ७५७ नवीन विद्युत लाईन जोडण्यात आल्या. ८९५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. ७५० कि.ग्रॅ. बी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ८९० नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले. तसेच विविध योजनांचे १७ हजार ५०९ अर्ज वितरित करण्यात आले. एकूण ६२० नागरिकांची आधार कार्ड नोंदणी करण्यात आली. या मेळाव्याला एकूण ३ लाख ५ हजार ९१२ नागरीकांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे सन २०१२ या वर्षात एकूण ४३ जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले. त्यात सामूहिक विवाह योजनेत ७१ जोडप्यांचे शुभमंगल झाले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन ६ हजार ७८३ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तंटामुक्त झालेल्या २३ गावांना ६४ लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. ७ हजार ४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ११५ नवीन विद्युत लाईन जोडण्यात आल्या. २२५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. २२० कि.ग्रॅ. बी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ४५ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले. तसेच विविध योजनांचे १ हजार ३१२ अर्ज वितरित करण्यात आले. या मेळाव्याला एकूण १ लाख १६ हजार १५० नागरिकांनी हजेरी लावली होती. सन २००५ ला ३९ मेळावे घेण्यात आले असून त्यात सामूहिक विवाहात ३३८ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. तसेच या वर्षी २० नक्षल समर्थक व १ नक्षल सदस्याने आत्मसमर्पण केले. सन २००६ मध्ये २१ मेळावे घेऊन नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. सामुहिक विवाहात ३८८ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. १५ नक्षल समर्थकांनी हत्यारासह आत्मसमर्पण केले. सन २००७ मध्ये १३ जनजागरण मेळावे, सन २००८ मध्ये ९ जनजागरण मेळावे, सन २००९ मध्ये ५ जनजागरण मेळावे, सन २०१० मध्ये ५ जनजागरण मेळावे घेऊन सामूहिक विवाहात ८६ जोडपी विवाहबध्द झाली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)