शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

आदिवासी महामंडळात ८३ टक्के पदे रिक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपनन निरिक्षक व इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक (प्रशासन) दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पाच, कनिष्ठ सहायकाची दोन, टंकलिपीकाची तसेच गोदामपाल व इतरही पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देअनेक वर्षापासून भरतीच नाही : अत्यल्प मनुष्यबळावर सुरू आहे कारभार

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. खरेदीच्या व्यवहारात हुंड्या काढण्यापासून धान भरडाई तसेच इतर सर्व कामे महामंडळामार्फत होतात. मात्र महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वच पाच उपप्रादेशिक कार्यालयात तसेच प्रादेशिक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून २२० पैकी तब्बल १८३ पदे रिक्त आहेत. ८३ टक्के पदे रिक्त असल्याने केवळ १७ टक्के कर्मचाऱ्यांवरच महामंडळाचा कारभार चालविला जात आहे.गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपनन निरिक्षक व इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक (प्रशासन) दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पाच, कनिष्ठ सहायकाची दोन, टंकलिपीकाची तसेच गोदामपाल व इतरही पदे रिक्त आहेत. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयात एकूण ४० पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ पाचच पदे नियमित स्वरूपात भरण्यात आली आहे. येथे तब्बल ३५ पदे रिक्त आहेत. उपप्रादेशिक व्यवस्थापकास विपणन निरिक्षकाची आठ व इतर पदे रिक्त आहेत. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३६ पदे मंजूर असून केवळ तीन पदे भरण्यात आले आहेत. या कार्यालयात ३३ पदे रिक्त आहे. यामध्ये विपणन निरिक्षकाची सात, कनिष्ठ सहायक विक्रेत्याची तीन, रखवालदार व इतर पदांचा समावेश आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयात एकूण ३८ पदे मंजूर असून सहा पदे भरण्यात आली आहे. येथे ३२ पदे रिक्त आहेत. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ३६ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ पाच पदे भरण्यात आली असून ३१ पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहे. उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत ३९ पदे मंजूर आहेत. यापैकी चार पदे भरण्यात आली असून ३५ पदे रिक्त आहे. रिक्त पदांमध्ये विपणन निरिक्षक, कनिष्ठ सहायक, रखवालदार व इतर पदांचा समावेश आहे.आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थेच्या वतीने गडचिरोली कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात ५० धान खरेदी केंद्र सुरू आहे. आतापर्यंत या केंद्रांवर सव्वा लाखाच्या आसपास धानाची खरेदी झाली आहे. या धानाच्या हुंड्या काढण्यापासून आॅनलाईन चुकारे, इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. मात्र या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. सातत्याने मागणी करूनही राज्य शासनाने महामंडळाच्या कार्यालयामध्ये भरती प्रक्रिया राबवून नवे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले नाही. परिणामी कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात बरेचदा अडचणी येत आहेत.प्रतवारीकारांची ५२ पदे रिक्तआविका संस्थेच्या केंद्रावर विक्रीसाठी येणाºया धानाची प्रतवारी कोणती आहे, हे प्रतवारीकार आपल्या ज्ञानानुसार स्पष्ट करतो. मात्र महामंडळाच्या कार्यालयात जिल्हाभरात ५२ पदे रिक्त आहेत. यामध्ये कुरखेडा, घोट, धानोरा, आरमोरी, कोरची आदी उपप्रादेशिक कार्यालयाचा समावेश आहे. ५० धान खरेदी केंद्रावर प्रतवारीकार असणे आवश्यक आहे. मात्र नियमित प्रतवारीकारांची नियुक्ती करण्यात न आल्याने आविका संस्थांना ग्रेडर ठेवण्याची मान्यता शासनाने दिली आहे. त्यानुसार आविका संस्थांनी आपल्यास्तरावर ग्रेडर ठेवले आहेत.व्यवस्थापकांकडे दोन पदाचा प्रभारआदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून जी. पी. राजुरकर कार्यरत आहेत. यांच्याकडे गोंडपिपरी कार्यालयाच्या उपव्यवस्थापकपदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्याकडे चंद्रपूर कार्यालयातील प्रादेशिक व्यवस्थापकाचीही जबाबदारी होती. आता चंद्रपूर येथे दुसरे अधिकारी आले असून राजुरकर यांना गडचिरोली व गोंडपिपरीचा कारभार सांभाळावा लागत आहे.१६ कर्मचारी सांभाळतात पाच तालुक्याचा कारभारआदिवासी विकास महामंडळाअंतर्गत अहेरी येथे उच्च श्रेणी उपप्रादेशिक कार्यालय आहे. या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा आदी पाच तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जवळपास ३५ धान खरेदी केंद्र आहेत. या सर्व धान खरेदी केंद्रावर व व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अहेरी कार्यालयातील कर्मचाºयांवर आहे. अहेरी उच्च श्रेणी कार्यालयात एकूण ९० पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ १७ पदे भरण्यात आली असून ७३ पदे रिकत आहेत. अहेरीपासून १३५ किमी अंतरावरील आसरअल्ली धान खरेदी केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड