शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

८०.६० लाखांचे अग्निशमन वाहन कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:27 IST

नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे.

ऑनलाईन लोकमतअहेरी : नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे हे वाहन उभ्या उभ्याच सडणार का? असा प्रश्न नगरवासीय विचारत आहेत.५ फेब्रुवारीला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयाला मोठी आग लागून ५० लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जळाले. मात्र ही आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहनाचा कोणताही उपयोग झाला नाही. शहरात तसेच तालुक्यात आजपर्यंत आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण अग्निशमन वाहन आल्यानंतरही त्या आगी विजविण्यासाठी या वाहनाचा कोणताही उपयोग झाला नाही. आतापर्यंत केवळ एकदाच अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव या गावी शेतात लागलेली आग विझविण्यासाठी हे वाहन गेले. नगर पंचायतच्या या अग्निशमन वाहनाला चालकच नाही. एवढेच नाही तर आग विझविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीही नाही. वाहन देताना कंपनीने जी प्राथमिक माहिती कर्मचऱ्यांना दिली त्याच्या जोरावर दिवस काढले जात आहेत. सदर वाहन व्यवस्थित चालवण्यासाठी फायरमन, लिडिंग फायरमन व वाहनचालक अशा कमीत कमी आठ जणांची टीम असणे गरजेचे आहे. त्यात महत्वाचं म्हणजे फायर स्टेशन असणे आवश्यक आहे. लोक त्याच ठिकाणी फोन करून अग्निशमन वाहन मागवू शकतील. पण ते नसल्याने हे वाहन पांढरा हत्ती झाले आहे.यंत्रणेची अशीही उदासीनताअहेरी नगर पंचायतीला २२ आॅगस्ट २०२७ रोजी अग्निशमन वाहन आले. परंतु तत्पूर्वी नगर पंचायतने प्रशासकीय मान्यता घेताना प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी केली. त्यानंतर ४ आॅक्टोबर व २९ डिसेंबर २०१७ तसेच ३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आयुक्त तथा संचालक नगर प्रशासन मुंबई यांना पत्रव्यवहार केला. पण अजूनपर्यत प्रशिक्षित मनुष्यबळासाठी कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आले नाही.