शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत ८० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:06 IST

देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व विविध संस्था तसेच बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीच्या आदेशानुसार ८ सप्टेंबर रोजी शनिवारला जिल्ह्याच्या सर्व न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हाभरात एकूण ८० प्रकरणे निकाली काढण्यात आली व या प्रकरणातून एकूण ९३ लाख ३८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली.

ठळक मुद्दे९३ लाखांची वसुली : जिल्ह्याच्या सर्व न्यायालयात आपसी तडजोड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व विविध संस्था तसेच बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीच्या आदेशानुसार ८ सप्टेंबर रोजी शनिवारला जिल्ह्याच्या सर्व न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हाभरात एकूण ८० प्रकरणे निकाली काढण्यात आली व या प्रकरणातून एकूण ९३ लाख ३८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली.राष्टÑीय लोक न्यायालयामध्ये ५१ लाख ६८ हजार ४४१ रूपयांची एकूण २३ प्रकरणे प्रलंबित होती. तसेच ४१ लाख ३१ हजार ५९७ रूपयांची दाखलपूर्व प्रकरणाची संख्या ५७ होती. प्रलंबित व दाखलपूर्व अशी सर्व मिळून एकूण ८० प्रकरणे लोक न्यायालयात निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राधिकरणाचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली लोकअदालत घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तर दिवानी न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी पॅनल क्रमांक २ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पी. बी. बोरावार व इतर अधिवक्ता मंडळी, विधी स्वयंसेवक तसेच बँकांच्या पदाधिकारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.