शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकीदारांनी भरले पाच दिवसात ८० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:25 IST

महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले.

ठळक मुद्देमहावितरणची विशेष मोहीम : ९७३ वीज जोडण्या कापल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले. दुसरीकडे वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९७३ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. तर ४९७९ ग्राहकांनी थकित असलेले वीज बिल तातडीने भरले.प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, ग्रामीण आणि शहरी पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये, यासह कृषिपंपधारकांवर कोट्यवधी रुपयांचे बिल बाकी बाकी आहे. बºयाच दिवसांपासून वीज बिल भरले नसल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीवर आर्थिक संकट आले होते. त्यातून बाहेर येण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान वीज बिल वसुली अभियान चालविण्यात आले. यादरम्यान ज्या वीज ग्राहकांनी थकित बिल भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.जिल्ह्यात गडचिरोली आणि आलापल्ली या दोन विभागात ९७३ वीज ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरली नाही. त्यामुळे त्यांचे कनेक्शन कापण्यात आले. यानंतरही काही दिवस मोहीम सुरू राहणार असल्याने वसुली अजून वाढेल.४९७९ ग्राहकांनी भरली थकबाकीया विशेष मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार ९७९ वीज ग्राहकांनी तत्काळ थकित असलेले वीज बिल जमा केले. त्यांनी भरलेल्या एकूण बिलाची रक्कम ८२ लाख ३५ हजार रुपये आहे. विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले की, २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा मोहीम सुरू राहील. ग्राहकांनी सहकार्य करून वीज कापण्याची नामुष्की येऊ देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.