शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

७९ हजार रूपयांची दारू जप्त

By admin | Updated: July 18, 2015 01:33 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारूबंदी पथकाने गडचिरोली शहरातील दोन वॉर्डात गुरूवारी तसेच आरमोरी पोलिसांनी तालुका मुख्यालयालगतच्या रामाळा येथे ....

दारूबंदी पथकाची कारवाई : गडचिरोली व आरमोरीत पोलिसांची धाड; मुद्देमालाचा समावेशगडचिरोली/आरमोरी : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारूबंदी पथकाने गडचिरोली शहरातील दोन वॉर्डात गुरूवारी तसेच आरमोरी पोलिसांनी तालुका मुख्यालयालगतच्या रामाळा येथे बुधवारी तीन हातभट्ट्यांवर धाड टाकून मोहफुलाची दारू जप्त केली. दोन्ही ठिकाणाहून ७९ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गडचिरोली शहरातील रामपुरी वॉर्डात अवैधरित्या दारूविक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळताच धाड टाकून १८० मिली ३ हजार ८०० रूपये किमतीच्या ३८ निपा, ९० मिली तीन हजार रूपये किमतीच्या ६० निपा अशी एकूण ६ हजार ८०० रूपयांची देशी दारू जप्त केली. रामपुरी वॉर्डातील रवींद्र टेकाम, महेश टेकाम हे अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत होते. पोलिसांनी पंचासमक्ष दारू पकडून आरोपींना दारूसह ताब्यात घेतले. तसेच शहरातील नेहरू वॉर्डात कृष्णा सीताराम बिंदे, शकुंतला मेश्राम हे अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून देशी दारू व दुचाकी असा एकूण ५७ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कृष्णा बिंदे, शकुंतला मेश्राम यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार शंकर डांगे, मिर्गे, बाला, राठोड, ढवळे, दुधलकर, दुग्गा, तायडे यांनी केली.आरमोरीनजीकच्या रामाळा येथे तीन ठिकाणी हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी घटनास्थळी धाड टाकून १५ हजार रूपयांची दारू जप्त केली. त्याबरोबरच संगीता हरिचंद्र राऊत, वनिता दामोदर शेंद्रे, इंदू अजय नेवारे सर्व रा. रामाळा यांना अटक केली आहे. रामाळा-ठाणेगाव मार्गावरील लगतच्या झुडूपात आरोपी हातभट्टी लावून मोहाची दारू काढून त्याची विक्री करीत होते. बुधवारी पोलिसांनी घटनास्थळ गाठून संगीता राऊत यांच्याकडून ४० लिटर मोहफूल दारू व ५० किलो मोहफूल असा एकूण ६ हजार ५०० रूपयांचा माल वनिता दामोदर शेंद्रे यांच्याकडून ३० लिटर मोहफूल दारू व ४० किलो मोहफुलाचा सडवा, असा एकूण ४ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल तसेच आरोपी इंदू नेवारे यांच्याकडून ३० लिटर मोहफुलाच्या दारूसह ४० किलो सडवा असा एकूण ४ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही ठिकाणाहून १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर दारूबंदी कायदा ६५ (ई) (क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई प्रभारी ठाणेदार बच्छलवार, उंदीरवाडे, गोकुल मेश्राम, कन्नाके, म्हशाखेत्री यांनी केली.