गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून राकाँ डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, माजी जि. अध्यक्षा हर्षलता येलमुले, माजी प्राचार्य खुशाल वाघरे, रिंकू पापडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान गडचिरोलीचे पहिले सरपंच रामजी खोब्रागडे, मुरलीधर हेमके, तुकाराम चन्नावार ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय बर्लावार, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव देवाजी सोनटक्के, कोषाध्यक्ष देवानंद गेडाम, सहसचिव बापूजी होकम, सदस्य जगन्नाथ ब्राह्मणवाडे, दिवाकर वडेट्टीवार, जयंत उमडवार, वासुदेव मोहुर्ले, नानाजी वाढई, सुधाकर चन्नावार, सय्यद अक्रमअली, मनोहर अलमपटलावार, कमल गेडाम, सोनाबाई काळबांधे, माणिकबाई पुण्यपवार यांच्यासह इतर ७५ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश पोरेड्डीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष असला तरी सामाजिक उपक्रम राबवून लोकसेवेला प्रथम प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन केले. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे अनुभव युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. ज्येष्ठांसाठी शासनाने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असे प्रतिपादन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष नितीन खोब्रागडे, गुरूदेव भोपये, रामचंद्र वाढई, सुभाष धाईत, संजय गोरडवार, सचिन चौधरी, अरूण हरडे, आकाश पगाडे, नंदू पगाडे, संजय खोब्रागडे, वासुदेव सहारे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
By admin | Updated: December 15, 2015 03:35 IST