शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

७०.३३ कोटींचा खर्च

By admin | Updated: December 7, 2015 05:30 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या नियंत्रणाखाली

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या नियंत्रणाखाली बाराही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर तसेच यंत्रणास्तरावर रस्ते, बोडी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, राजीव गांधी भवन, शौचालय बांधकाम, वृक्ष लागवड आदीसह विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच सद्य:स्थितीत ग्रामपंचायतस्तरावर नरेगाचे विविध कामे सुरू करण्यात आले आहेत. १ एप्रिल ते १ डिसेंबर २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत नरेगाच्या कामांवर एकूण ७०.३३ कोटी रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती नरेगा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.अहेरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या नरेगाच्या विविध कामांवर मजुरी व बांधकाम साहित्यांवर मिळून गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत २६०.२५ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यात ८४२.०६ लाख, भामरागड १६४.१४ लाख, चामोर्शी ६९४.९५ लाख, देसाईगंज ४७०.७८ लाख, धानोरा ११२८.१५ लाख, एटापल्ली ४१३.१७ लाख, गडचिरोली ८३२.२३ लाख, कोरची ६४१.६५ लाख, कुरखेडा ९२६.२४ लाख, मुलचेरा ४२८.०१ व सिरोंचा तालुक्यात नरेगाच्या कामांवर मजुरी व साहित्य मिळून एकूण २००.०४ लाख रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अहेरी तालुक्यातील नरेगाच्या विविध कामांवर मजुरींवर १४३.६३ लाख, आरमोरी ५०७.०५ लाख, भामरागड ८०.०१ लाख, चामोर्शी ५४४.५६ लाख, देसाईगंज ११५.८५ लाख, धानोरा ८५०.३७ लाख, एटापल्ली २६६.९१ लाख, गडचिरोली ५८५.७० लाख, कोरची ३६७.०२ लाख, कुरखेडा ६१०.९ लाख, मुलचेरा २७४.८३ लाख व सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील कामावर १४२.९४ लाख रूपयांचा खर्च मजुरीवर झाला आहे.जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत नरेगाच्या कामावरील बांधकाम साहित्यावर एकूण १९६०.६८ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात १००.०७ लाख, आरमोरी २९८.१५ लाख, भामरागड ६७.५६ लाख, चामोर्शी १०३.११ लाख, देसाईगंज १२८.६५ लाख, धानोरा २४१.१८ लाख, एटापल्ली १२२.२३ लाख, गडचिरोली २०८.९ लाख, कोरची २४३.३९ लाख, कुरखेडा ६६९.०५ लाख, मुलचेरा १३७.५ लाख व सिरोंचा तालुक्यात नरेगाच्या कामावरील बांधकाम साहित्यावर ४०.२६ लाखांचा खर्च झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)१ कोटी ९७ लाख ३५ हजार रूपये अदा करणे आहे शिल्लक४महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर विविध कामे आटोपली आहेत. तर काही कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांवरील मजुरी व बांधकाम साहित्यांवर झालेल्या खर्चाचा तब्बल १ कोटी ९७ लाख ३५ हजार रूपयांचा निधी नरेगा विभागाला अदा करणे शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या कामांवरील उर्वरित निधी अदा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आलेल्या जुन्या वैयक्तिक सिंचन विहिरींच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नव्या सिंचन विहिरींचे काम सुरू केले आहे.३२५ ग्रा.पं.मध्ये नरेगाच्या कामांना प्रारंभच नाही४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या जिल्ह्यातील १३५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रस्ते, बोडी, मजगी, शेततळे व इतर कामे सुरू आहेत. मात्र बाराही तालुक्यातील तब्बल ३२५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये अद्यापही नरेगाच्या कामांना प्रारंभच करण्यात आला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कामे सुरू करण्यात न आल्याने रोजगाराअभावी जिल्ह्यातील शेकडो मजूर जिल्हाबाहेर कामासाठी स्थलांतरीत होत आहे. सध्या सुरू असलेल्या नरेगाच्या कामांवर ६ हजार २५० मजूर कार्यरत आहेत. चामोर्शी व धानोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरेगाचे कामे ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केले नाहीत.