लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आरमोरी विधानसभा क्षेत्रात सुमारे ६९.२३ किमीचे रस्ते होणार आहेत. यापैकी काही रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. या रस्त्यांच्या निर्मितीसाठी आमदार कृष्णा गजबे यांनी पाठपुरावा केला होता.जो ग्रामीण भाग रस्त्यांनी जोडला गेला नाही. अशा भागाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्राधान्य दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेंतर्गत शेकडो किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात जिल्हाभरात २८१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६९.२३ किमी रस्त्यांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील जिल्हा महामार्ग ते गरगडा-कटंगटोला रस्ता ५.५७ किमीचा असून सदर रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी ३ कोटी ४२ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. वडेगाव-धुटीटोला मार्गासाठी ८९.५३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर ते उसेगाव आरमोरी तालुक्यातील आरमोरी ते शिवणी, आरमोरी ते जोगीसाखरा, सायगाव रस्ता, रवी-मुल्लूरचेक रस्ता, धानोरा तालुक्यातील निमगाव ते मोहटोला रस्ता, कुरखेडा तालुक्यातील खैरी टोला रस्ता, वाढोणा मार्ग यांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव मार्गाचीही दर्जोन्नती केली जाणार आहे.प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गतची काही कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केली जाणार आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जास्तीतजास्त रस्त्यांची दुरूस्ती व्हावी, यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर काही मार्गांचा निधीही उपलब्ध झाला असून रस्ता दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. इतरही कामे लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७० किमीचे रस्ते मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:09 IST
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आरमोरी विधानसभा क्षेत्रात सुमारे ६९.२३ किमीचे रस्ते होणार आहेत.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७० किमीचे रस्ते मंजूर
ठळक मुद्देआमदारांनी केला होता पाठपुरावा : आरमोरी व कुरखेडातील सर्वाधिक रस्ते