दीड वर्षात : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईगडचिरोली : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरिक्षक व चंद्रपूर स्थित भरारी पथकाने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ व २०१५-१६ च्या आॅगस्ट अखेरपर्यंत दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी धाड टाकून देशी, विदेशी दारू, मोहफुलाचा सडवा यांच्यासह एकूण ७ लाख ८२ हजार ३३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व याप्रकरणी ११७ आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली. गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर आळा बसावा तसेच राज्य शासनाच्या उत्पादनात वाढवावी या हेतूने शासनाने गडचिरोली शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू केले. या कार्यालयात निरिक्षक, दुय्यम निरिक्षकांसह एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच चंद्रपूर स्थित भरारी पथकाकडून जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबवून कारवाई करण्यात येते. २०१४-१५ या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीच्या वतीने अवैध दारू विक्रीसंदर्भात एकूण २१२ गुन्हे नोंदविण्यात आले. यातील ८५ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच या वर्षात १२७ बेवारस आरोपी आढळून आले. २०१४-१५ वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४ लाख ६२ हजार ७५६ रूपयांची देशी, विदेशी दारू व मोहफुलाचा सडवा तसेच मुद्देमाल जप्त केला. २०१५-१६ यावर्षात एप्रिल महिन्यात सहा आरोपींकडून ४७ हजार ७०, मे महिन्यात सात आरोपींकडून ४० हजार ६३७, जून महिन्यात आठ आरोपींकडून १ लाख ४० हजार ९३०, जुलै महिन्यात चार आरोपींकडून २० हजार ५५० व आॅगस्ट महिन्यात सात आरोपींकडून ७० हजार ९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. २०१५-१६ वर्षात ३२ आरोपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. (स्थानिक प्रतिनिधी)
दारूसह ७ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By admin | Updated: October 5, 2015 01:43 IST