शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

७९ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर

By admin | Updated: June 26, 2014 23:13 IST

नक्षल समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मोठ्या शहरांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त

पोलीस विभागाचा पुढाकार : नक्षल्यांच्या कुटुंबातील सदस्यही सहलीत सहभागीगडचिरोली : नक्षल समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मोठ्या शहरांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्र दर्शन या सहलीचे आयोजन गतवर्षीपासून केल्या जात आहे. आज गडचिरोली पोलीस मुख्यालयातून या वर्षीच्या पाचव्या टप्प्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. १० दिवशीय सहलीत ७९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित तसेच नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांच्याही सदस्यांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभाग व पोलीस विभागाच्या पुढाकाराने आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नक्षली सदस्यांचे तसेच नक्षल पीडितांचे मुले-मुली सहलीत सहभागी झाले आहेत. यात आत्मसमर्पित नक्षलवादी जानकी तिम्माचा भाऊ विकास तिम्मा रा.होडरी, आत्मसमर्पित नक्षली विजय गावडे याची पुतणी रजनी गावडे, प्लाटून एक सेक्शनच्या सदस्य दशरथ कोडवे याचा पुतण्या शिवलाल हरमे, देवरी दलमचा कमांडर रामदास हलामीची पुतणी रोशनी हलामी आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान नक्षली सदस्यांच्या कुटुुंबिय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुंबई व पुणे या मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक स्थळांविषयही माहिती जाणून घेण्याची जी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करण्याचा मानस सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. सहलीत ५ नक्षली सदस्यांचे नातेवाईक विद्यार्थी तसेच नक्षल पीडित कुटुुंबातील ९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमादरम्यान रोशनी हलामी व मंगेश मडावी या विद्यार्थ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या हस्ते पुस्तके वितरीत करण्यात आले.दरम्यान राजकुमार शिंदे यांनीही मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सहलीचा प्रारंभ पोलीस मुख्यालयातून करण्यात आला. सहलीचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा पोलीस मुख्यालयात ५ जुलै रोजी होणार आहे. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सुवेज हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, आदिवासी विभागाचे नियोजन अधिकारी डी. बी. खडतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रविण निंबाळकर तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. इलमकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)