शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

६८३ गावांना पोलीस पाटीलच नाहीत, नक्षलग्रस्त गडचिरोलीतील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:49 IST

पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा असलेले पोलीस पाटलाचे पद प्रत्येक गावासाठी महत्वाचे असते

मनोज ताजने  गडचिरोली : पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा असलेले पोलीस पाटलाचे पद प्रत्येक गावासाठी महत्वाचे असते. त्यातही नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. मात्र आजच्या स्थितीत या अतिसंवेदनशिल जिल्ह्यात पोलीस पाटलांची १५३५ पैकी ६८३ पदे, म्हणजे ४५ टक्के पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालीच झाल्या नाहीत हे विशेष.प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे काम पोलीस पाटील करतात. याशिवाय रहिवासी दाखले देण्यासाठीही त्यांची गरज असते. त्यांची निवड संबंधित क्षेत्राच्या उपविभागीय दंडाधिकाºयांमार्फत (एसडीओ) होत असली तरी त्यांचा प्रामुख्याने संबंध पोलीस यंत्रणेशी असतो. गावातील तंट्यांपासून तर घडणाºया प्रत्येक घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते. एकदा रितसर निवड झाल्यानंतर वयाच्या ६० वर्षापर्यंत ती व्यक्ती पोलीस पाटीलपदी राहते. यादरम्यान दर १० वर्षांनी तहसीलदार आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांकडून येणाºया अहवालानुसार त्यांची नियुक्ती पुढील १० वर्षांसाठी सुरक्षित केली जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावातील पोलीस पाटलांची पदे रिक्त झाल्यानंतर ती भरण्यातच आली नाहीत.जिल्ह्यात ६ उपविभागीय अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली १२ तालुक्यांचा कारभार चालतो. यातील देसाईगंज सोडल्यास सर्वच उपविभाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल आहेत. मात्र पोलीस पाटलांची ४५ टक्के पदे रिक्त असल्याने गावातील नक्षल कारवायांशी संबंधित घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत तातडीने पोहोचण्यास अडचणी येतात. तरीही ही पदे अनेक वर्षांपासून का भरण्यात आली नाहीत? हा प्रश्न अनुत्तरित  आहे.

आतापर्यंत ३३ पोलीस पाटलांची हत्यानक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याचा ठपका ठेऊन नक्षल्यांकडून आतापर्यंत ३३ पोलीस पाटलांची हत्या करण्यात आली आहे. १९८५ पासून झालेल्या या हत्यांचे सत्र अलिकडे कमी झाले आहे. तरीही गेल्या चार वर्षात तीन पोलीस पाटलांची हत्या झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पोलीस पाटील पदावर काम करणे काहीसे जोखमीचे असले तरीही अनेक जण त्यासाठी इच्छुक आहेत. मात्र प्रशासनाकडून भरतीसाठी पुढाकार घेतला जात नाही.

पेसा कायद्यानुसार सुधारणाही नाहीनोव्हेंबर २०१५ मध्ये शासनाने पोलीस पाटलांच्या पदांबाबत नवीन रोस्टर पाठविले. त्यानुसार ‘पेसा’ कायद्यांतर्गत येणाºया गावांमध्ये पोलीस पाटील हे आदिवासी समाजाचे (अनुसूचित जमाती) असावेत असे नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३०० पेक्षा पेसा गावांमध्ये आदिवासी समाजाचे पोलीस पाटील राहणे अपेक्षित होते. मात्र या रोस्टरचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पैसा कायदा लागू असलेल्या अनेक गावांमध्ये अजूनही गैरआदिवासी लोक या पदावर कार्यरत आहेत.

जिल्ह्यात पोलीस पाटलांची पदे लवकरात लवकर भरावी यासाठी आम्ही राज्य शासनासह विभागीय आयुक्तांकडे अनेक वेळा निवेदने पाठविली, पण उपयोग झाला नाही. याशिवाय नवनियुक्त पोलीस पाटलांचे प्रशिक्षण घ्यावे असा शासनाचा जी.आर. आहे. मात्र आजपर्यंत या जिल्ह्यात कधीही पोलीस पाटलांचे प्रशिक्षण झाले नाही.- शरद ब्राह्मणवाडे, अध्यक्ष, पो.पा.संघटना, जिल्हा गडचिरोली

जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या भरतीसाठी शासनाकडून कोणतीही अडचण नाही. पण गेल्या काही वर्षात भरती झाली नाही हे बरोबर आहे. मात्र आता ही भरती प्रक्रिया सुरू करीत आहोत. पुढील २-३ महिन्यात जिल्ह्यात कोतवाल आणि पोलीस पाटलांची पदे भरली जातील.- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, गडचिरोली