शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

वर्षभरात गडचिरोलीत ६५ नक्षलवाद्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:13 IST

राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देनऊ नक्षलवादी ठार : नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याची डीआयजी शिंदे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय पोलीस कारवाईदरम्यान ४० चकमकी होऊन नऊ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.पाच दिवसीय वार्षिक निरीक्षणानंतर बुधवारी त्यांनी वर्षभरातील नक्षल कारवाया आणि पोलीस विभागाने राबविलेले उपक्रम याबद्दलची माहिती पत्रपरिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत नक्षली कारवाया नियंत्रणात ठेवण्यात पोलीस विभागाला मोठे यश आल्याचे शिंदे यांनी सांगितले. छत्तीसगड सिमेवरील अबुझमाडच्या जंगलात पहिल्यांदाच गडचिरोली पोलिसांनी शिरून दोन वेळा नक्षलवाद्यांचे ७ घोडे जप्त केले. २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. १३५ शस्त्रास्त्र आणि १५० किलो स्फोटकं जप्त केली. गेल्यावर्षी नक्षल्यांनी ७६ विविध प्रकारचे गुन्हे घडविले होते. यावर्षी ६२ गुन्हे झाले आहेत. गेल्यावर्षी नक्षल्यांनी १४ निरपराध आदिवासींची हत्या केली होती. यावर्षी ७ जणांची हत्या झाली.यावर्षी नागरिकांमध्ये जागृती करण्यात यश आल्याने नक्षल सप्ताहाला नागरिकांनी प्रथमच उघड विरोध दर्शविला. त्यामुळे हा सप्ताह नक्षलविरोधी सप्ताह झाला. नक्षल चळवळीत भरती होण्यासाठी आता गडचिरोली जिल्ह्यातून कोणी तयार होत नसल्यामुळे छत्तीसगडमधील युवक-युवतींना समाविष्ट करण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहितीही यावेळी उपमहानिरीक्षक शिंदे आणि पो.अधीक्षक डॉ.देशमुख यांनी दिली.पाच दिवस झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या निरीक्षणावर डीआयजी शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.तीन राज्यांच्या सीमेवर नवीन एओपीनक्षल्यांचे गडचिरोली जिल्ह्यातील अस्तित्व काहीसे कमी झाले असले तरी गोंदिया-बालाघाट-राजनांदगाव या तीन राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमिळून नक्षल्यांनी नवीन ठिय्या तयार केला आहे. त्याला नियंत्रणात करण्यासाठी मुरकूटडोह येथे नवीन सशस्त्र दूरक्षेत्र (एओपी) तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.नागरी कृती कार्यक्रमाची व्याप्ती वाढणारगडचिरोली जिल्ह्यात पोलीस वगळता इतर विभागांमध्ये अधिकारी-कर्मचाºयांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीसच ग्रामीण भागात इतर विभागांची कामेही करतात. त्यासाठी पोलीस विभागाला स्वतंत्र निधी देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे यावेळी पो.अधीक्षक डॉ.देशमुख यांनी सांगितले.युनो आणि केंद्र सरकारने ९ आॅगस्ट हा यावर्षीपासून आदिवासी दिन पाळण्याचे जाहीर केले. त्यानिमित्ताने आदिवासींसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांच्या प्रतिभेला चालना देण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे रेला नृत्य २६ जानेवारीच्या पथसंचलनात समाविष्ट करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.नक्षल कारवायांवर देखरेख करण्यासाठी ड्रोन खरेदीची प्रक्रिया सुरू असून तीन नवीन पोलीस मदत केंद्र प्रस्तावित असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी