लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: मागील दोन वर्षांच्या कालावधीत शासनाने मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी दिली आहे. तरीही काही नागरिक घरकुलापासून वंचित आहेत. ज्यांना घरकुलाची गरज आहे, त्यांनी स्वतःच सर्व्हे करून नोंदणी करायची होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६४ हजार ३४१ जणांनी नोंदणी केली आहे. हे खरेच घरकुलासाठी पात्र आहेत काय, याची पडताळणी केली जात आहे.
देशातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहू नये, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेचा आता दुसरा टप्पा सुरू आहे. 'ड' यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच नागरिकांना घरकुलाचा लाभदेण्यात येत आहे. मात्र ही यादी जवळपास आठ वर्षांपूर्वीची आहे. या कालावधीत काही कुटुंबांचे विभाजन झाले; तर काही लाभार्थी 'ड' यादीतून चुकीने सुटले. अशांना घरकुलाची संधी देण्यासाठी केंद्र शासनाने घरकुलांच्या सर्व्हेचे आदेश दिले. तो स्मार्ट फोनच्या साहाय्याने करावयाचा होता. यात अनेकांनी सर्व्हे करीत घरकुलासाठी नोंदणी केली आहे.
घरकुलाची अपेक्षा'ड' यादीतील नागरिकांना घरकुल मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र यातील सर्वच लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली. अनेकांना पक्की घरे आहेत. काही नोकरीवर आहेत. अशांनाही घरकुले मंजूर झाली आहेत. आपल्यालाही घरकुल मिळेल या अपेक्षेने अनेकजण अपात्र असतानाही नोंदणी केली आहे.
२६ हजार ५७ नोंदणीची पडताळणी सुरूज्या नागरिकांनी घराची मागणी दर्शविली आहे, ते खरच घरकुलासाठी पात्र आहेत काय ? याची पडताळणी पंचायत समिती स्तरावरून केली जात आहे. सुमारे ८ हजार ८४९ घरांची पडताळणी झाली आहे. १७ हजार २०८ नोंदी प्रलंबित आहेत. पुन्हा यांतील काही नोंदी अपात्र होण्याची शक्यता आहे.
१२ महिने अनुदानाअभावी बरेच घरकुल अद्यापही अपूर्णउलटूनही अनेक घरांचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यानंतर घरकुलाच्या बांधकामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने लाभार्थ्यांनी नियोजन केले आहे.
तालुकानिहाय नोंदणीतालुका नोंदणी पात्रगडचिरोली ६३०१ १५९२धानोरा ५३२६ २९७५देसाईगंज ४७४४ १४८४आरमोरी ५९४९ १०२०कुरखेडा ६१६८ ७९५कोरची ३३३९ ९७६चामोर्शी १२२५१ ८६७६मुलचेरा ३०६५ ४०८अहेरी ६६६६ २५२९सिरोंचा ६८७७ ३७३६एटापल्ली ३१११ १६२०भामरागड ५४४ २४६एकूण ६४३४१ २६०५७
कागदपत्रे नसतानाही नोंदणीनोंदणी स्वतःच मोबाइल अॅपच्या साहाय्याने करायची होती. त्यामध्ये स्वतःच्या घराचा फोटो टाकायचा होता. अनेकांचे पक्के घर असतानाही त्याच पक्क्या घराचा फोटो अॅपवर अपलोड केला आहे. तर काही कुटुंबांत एकत्र राहत असतानाही दोन ते तीन भावांनी अर्ज नोंदविले आहेत. त्यामुळे ते अपात्र ठरले आहेत.
३८ हजार जणांची नोंदणी पहिल्याच टप्प्यात बादघरकुलाच्या लाभासाठी नागरिकांना स्वतःच नोंदणी करायची होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६४ हजार ३४१ जणांनी नोंदणी केली. पहिल्याच टप्प्यात ३८ हजार २८४ नोंदणी बाद झाली. पडताळणीचे काम सुरू आहे.