शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

सर्पदंशाचे ६०० बळी

By admin | Updated: July 18, 2014 00:02 IST

गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गाव अरण्य भागाला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात.

ग्रामीण भागात संख्या अधिक : गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांत दिलीप दहेलकर - गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गाव अरण्य भागाला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आजही ग्रामीण भागात उपचारासाठी आरोग्य व्यवस्था बळकट नाही. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यूचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात आहे. गेल्या तीन वर्षात ६२० नागरिकांचा मृत्यू केवळ सर्पदंशाने झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंशांने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर २०१२ या वर्षात १७८ नागरिकांचा सर्पदंशाने बळी गेला. २०१३ मध्ये २०७ तर २०१४ मध्ये २१५ नागरिकांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात २०१०-११ या वर्षात सर्पदंशाचे १०४ रूग्ण दाखल करण्यात आले. यापैकी ३ जणांना आपला जीव गमवावा लागला. २०११-१२ या वर्षात या रूग्णालयात सर्पदंशाचे ९४ रूग्ण दाखल झाले. यापैकी ७ रूग्णांचा मृत्यू झाला. २०१२-१३ या वर्षात सर्पदंशाचे ११७ रूग्ण दाखल करण्यात आले. यापैकी ६ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१३-१४ या वर्षात सर्पदंशाचे १०१ रूग्ण दाखल करण्यात आले. यापैकी ४ जणांचा बळी गेला. एप्रिल ते जून २०१४ या दरम्यान येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्पदंशाचे ८ रूग्ण दाखल करण्यात आले. त्यांच्यावर लागलीच उपचार झाल्याने या सर्वांचे प्राण वाचले. सर्पदंश झालेल्या अनेक नागरिकांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मात्र ही परिस्थिती शहरी भागाची आहे. ग्रामीण व दुर्गम भागात स्थानिक पातळीवर आरोग्य सेवेच्या सोयीसुविधा नसल्यामुळे सर्पदंशाने अनेक नागरिकांचा बळी गेल्याचे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. साप आणि त्याचे विष...विषासंदर्भात सापांचे तीन गट पडतात़ यात बिनविषारी (नॉन व्हेनमस ) म्हणजे विष नसलेले, निमविषारी (सेमी व्हेनमस) सौम्य विष असलेले़ ज्या विषाने छोटे किटक, पाल, पक्षी आदी मरू शकतात पण, मोठे प्राणी किंवा माणूस मरू शकत नाही़ विषारी (व्हेनमस) म्हणजे ज्याच्या विषाने मोठे प्राणी किंवा माणूस मरू शकतो असे़ विशेष म्हणजे विषाला इंग्रजीत पॉईझन म्हणण्याचा प्रघात आहे़पण, सापाच्या विषाला व्हेनम असेच म्हणतात़ या विषांचेही दोन प्रकार पडतात़ एक रक्तविष (हेमोटॉक्सिक ) दुसरे मज्जाविष (न्युरोटॉक्सिक) होय़ रक्तविषाचा प्रभाव दंश केलेल्या प्राण्याच्या रक्तावर होतो़ या विषामुळे रक्त साकळण्याची प्रक्रीया अतिवेगाने वाढते़ त्यामुळे नसांमध्ये अवरोध निर्माण होऊन नसा सुजतात व फुटतात़ ही सूज वाढत गेल्यावर प्राणी मरतो़ हे विषय वायपर प्रजातीमध्ये असते़ मज्जाविष हे चेतासंस्था (नव्हर्स सिस्टिम) वर आघात करते़ त्यामुळे मेंदूवर परिणाम होऊन भोवळ येणे, जिभ जड होणे, शुद्ध हरपणे आदी लक्षणे दिसतात़ हे विष नाग व मण्यार या सापांमध्ये असते़