शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

६० ट्रॅप कॅमेरे, पथकही शोधतेय पण, तीन बळी घेणारा वाघ सापडेना!

By गेापाल लाजुरकर | Updated: January 7, 2024 19:49 IST

‘जी-१८’ हल्लेखोर वाघाची वाकडी परिसरात दहशत.

गडचिरोली : गडचिरोली वनपरिक्षेत्रातील वाकडी परिसरात दोन महिन्यांत तीन महिलांचा बळी घेणाऱ्या जी-१८ वाघाची दहशत कायम असून त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात ६० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघाचे लोकेशन कॅमेऱ्याद्वारे घेतले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आलेले पथकसुद्धा मागावर आहे; परंतु पथकाला वाघ हुलकावणी देत आहे.

वाकडी परिसरात गेल्या पाच वर्षांपासूनच वाघांचा वावर आहे. परंतु या परिसरात मानवावर वाघांनी हल्ले केले नव्हते. २४ नोव्हेंबरला हिरापूर व १५ डिसेंबर २०२३ रोजी गोविंदपूर व नवीन वर्षांत ३ जानेवारीला वाकडी येथील महिलेचा बळी वाघाने घेतला. तर मागील वर्षाअखेर ३० डिसेंबरला बाेदली येथील एका महिलेला जखमी केले. हे सर्व हल्ले जी-१८ वाघानेच केले. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून विशेष चमू बोलावली. स्थानिक एक चमू नेमली, तसेच परिसरात ६० ट्रॅप कॅमेरे लावले. दोन रेडे शिकार सापळे (बेट) सुद्धा लावले आहेत. वाघाच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवून आहे. वनविभागाकडून परिसरातील लोकांमध्ये जागृती केली जात आहे. लोकेशन मिळेनाजी-१८ ह्या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील डॉ. रविकांत खोब्रागडे यांची चमू तीन दिवसांपूर्वी दाखल झाली. यापूर्वी मुडझा, वाकडी, हिरापूर मारोडा, गुरवळा, गोविंदपूर आदी परिसरात ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावले; परंतु सदर वाघ हुलकावणी देत आहे. त्याचे निश्चित लोकेशन मिळत नसल्याने जेरबंद करण्याची मोहीम लांबत आहे.

वाकडीतील मुलांसाठी वाहनाची सोयवाकडी गावातील अनेक विद्यार्थी गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. ते संध्याकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचतात. त्यांना धोका होऊ नये यासाठी वनविभागाने गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील फाट्यापासून वाकडीपर्यंत जाण्यासाठी वाहनाची सोय केली. विद्यार्थी व उशिरा घरी जाणाऱ्या लाेकांनाही सुरक्षितरित्या घरी पोहोचविले जात आहे. जी-१८ वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालींवर ट्रॅप कॅमेरांद्वारे नजर आहे. बेटसुद्धा बांधले आहेत. काही भागांत वाघाचे पगमार्कसुद्धा आढळून आले आहेत. लवकरच वाघ जेरबंद केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी जंगलात जाऊ नये. वन विभागाला सहकार्य करावे.-मिलिश शर्मा, उपवन संरक्षक, वनविभाग, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली