शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे ६ मार्ग पाण्याखाली, गडचिरोलीतील २० गावांचा तुटला संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:22 IST

संततधार पावसाने दाणादाण : दक्षिण गडचिरोलीत नदी, नाले तुडूंब; पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाचे विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. नद्यांना पूर आल्याने सहा मार्ग बंद झाले. २० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला. कुरखेडातील सती नदीपात्रात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराच्या मदतीला पोलिस देवदूत बनून धावले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली, त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. धान पन्हे, तसेच आवत्या टाकण्यासाठीही अडचण झाली होती. मात्र, तीन दिवसांपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली. संततधारेने सगळीकडेच रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. नद्या, नाले खळखळून वाहिले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; पण अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने २० हून अधिक गावे संपर्काबाहेर आहेत.

मार्ग बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांना वळसा घालून जावे लागले. प्रशासनाचे आपत्तीग्रस्त गावांवर विशेष लक्ष असून, ठिकठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले.

देसाईगंज - ब्रह्मपुरीला मार्ग बंद, नागरिकांची त्रेधादेसाईगंज ते ब्रह्मपुरी या मार्गावरील भूती नदीवरील पुलाचे काम दोन वर्षापासून अद्याप पूर्ण झालेले नाही. पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली, परिणामी नागरिकांना ३२ किलोमीटर वळसा घालून आरमोरीहून गांगलवाडीमार्गे ब्रह्मपुरीला जावे लागले. देसाईगंज हा चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेला तालुका आहे. येथून गोंदिया, भंडारा, नागपूर जाण्यासाठी मागील दोन वर्षांपासून भूती नदीपात्रावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, रपटा पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद झाला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली.

कोंजेड गावाजवळ रस्त्याचा झाला नालाअहेरी तालुक्यातील कॉजेड गावाजवळील नाल्यावरील पूल तीन वर्षांपूर्वी वाहून गेला होता. यावर्षी पहिल्याच पावसात सिमेंट पाईप व भराव वाहून गेल्याने या ठिकाणी नाला तयार झाला. यामुळे परिसरातील गावांचाही संपर्क तुटला. जिमलगट्टा-देचलीपेठा-झिंगानूर मार्गावर कोंजेड गावाजवळील नाल्यावर तीन वर्षांअगोदर पाईप कलवट बनविण्यात आले, त्याच वर्षी आलेल्या पावसामुळे रस्ता वाहून गेला. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पाईप टाकून रस्ता बनविला होता. मात्र, यावर्षी पहिल्याच पावसात तो वाहून गेला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूर