शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

५९७ घरांचे बांधकाम अनधिकृत

By admin | Updated: December 24, 2015 02:02 IST

महसूल विभागाच्या वतीने गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात तब्बल ५९७ कृषक भूखंडावर....

कृषक भूखंडावर पक्के घर बांधकाम : २५० वर घरमालकांना बजावली नोटीसगडचिरोली : महसूल विभागाच्या वतीने गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात तब्बल ५९७ कृषक भूखंडावर अनाधिकृतरित्या घर बांधकाम केल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात गडचिरोलीचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी आतापर्यंत २५० वर अधिक अनाधिकृतपणे घर बांधकाम केलेल्या घरमालकांना नोटीस बजावली असून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात कृषक भूखंडाचे अकृषकमध्ये रूपांतरित करून घर बांधकाम करण्यास प्रशासनाच्या वतीने रितसर परवानगी दिली जाते. मात्र गडचिरोली शहराच्या देवापूर, लांजेडा, रामपूर, सोनापूर आदीसह इतर भागात कृषक भूखंडावर गेल्या दहा-बारा वर्षांत शेकडो घरांचे अनाधिकृत बांधकाम करण्यात आले. परिणामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये कृषक शेतसारा वसूल करण्यासाठी तालुका महसूल विभागाच्या वतीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे निर्देश तहसीलदारांना प्राप्त झाले होते. यानुसार गडचिरोलीच्या तहसीलदारांनी सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांना तत्काळ गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात झालेल्या घर बांधकामाबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. मंडळ अधिकारी व तलाठ्यांमार्फत शहरात सर्वेक्षण झाल्यानंतर तब्बल ५९७ घरांचे कृषक भूखंडावर बांधकाम करण्यात आले असून हे सारे बांधकाम अनाधिकृतरित्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व घरमालकांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे.दंडात्मक रकमेचा तत्काळ भरणा करून संबंधित घरमालकांनी महसूल विभागाला सहकार्य करावे, असेही घरमालकांना बजाविलेल्या नोटीसमध्ये महसूल विभागाने म्हटले आहे. याशिवाय कृषक भूखंडावर पक्क्या घराचे बांधकाम केलेल्या घरमालकांनी नोटीस मिळालेल्या तारखेपासून सहा महिन्यात कृषक भूखंडाचे अकृषकमध्ये रूपांतरित करावे, असे निर्देशही महसूल विभागाने घरमालकांना दिले आहे. कृषक जमिनीवर प्लॉट पाडून शहरात विक्रीही सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी) असा आकारला जात आहे दंडकृषक भूखंडावर अनाधिकृतरित्या पक्क्या घराचे बांधकाम केलेल्या घरमालकांना प्रति चौरस फूट ३६ रूपये दराने तसेच या दराच्या ४० पट दंडाची रक्कम आकारल्या जात आहे. घर बांधकामाला किती वर्ष झाले, या कालावधीनुसारही वेगळ्या दंडाची रक्कम घरमालकांकडून वसूल केली जात आहे. नगर पालिका प्रशासनाचे घर बांधकामावर नियंत्रण नाहीगडचिरोली शहरात मिळेल त्या ठिकाणच्या जागेवर अतिक्रमण करून पक्क्या घराचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासकीय तसेच निमशासकीय कृषक व अतिक्रमीत जागेवर शेकडो घरे उभी झाली आहेत. अशा ठिकाणी घर बांधलेल्या कुटुंबांना पालिका प्रशासनाच्या वतीने नळ जोडणी व विद्युत मीटरसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. शहरातील अनाधिकृत घर बांधकामावर गडचिरोली पालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ८० हजारांचा दंड वसूलकृषक भूखंडावर अनाधिकृतरित्या घर बांधलेल्या २५० वर अधिक घरमालकांना महसूल विभागाने नोटीस बजाविली आहे. उर्वरित घरमालकांना येत्या आठवडाभरात नोटीस पाठविण्यात येणार आहे. नोटीस मिळालेल्या जवळपास १५ ते २० घरमालकांनी दंडाची रक्कम अदा केली आहे. घर बांधकामापोटी महसूल विभागाने आतापर्यंत ८० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.आॅनलाईन नकाशाचे अवलोकनअतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तालुका महसूल प्रशासनाने गुगल अर्थ ही वेबसाईटची पाहणी केली. यामध्ये गडचिरोली शहरातील जागेचा नकाशा पाहिल्यानंतर तब्बल ५९७ कृषक भूखंडावर अनाधिकृतरित्या घराचे पक्के बांधकाम झाले असल्याचे आढळून आले, अशी माहिती गडचिरोलीचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.