शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भामरागडात ५७.१९ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 02:01 IST

भामरागड तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले.

शांततेत मतदान : पहिल्यांदाच सर्व पोलिंग पार्ट्या एकाच दिवशी दाखल भामरागड : भामरागड तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. भामरागड तालुक्यात ५७.१९ टक्के मतदान झाले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलिंग पार्ट्या आणण्यात आल्याने मतदानाच्या दिवशीच निर्धारित वेळेत सर्व पोलिंग पार्ट्या तहसील मुख्यालयात दाखल झाल्या. भामरागड तालुक्यात आरेवाडा क्र. १ च्या मतदान केंद्रांवर एकूण ४७४ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६१.९६ आहे. आरेवाडा केंद्र क्रमांक २ वर २३१ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ६४.८८ आहे. किअर मतदान केंद्रावर ६७.८४ टक्के मतदान झाले. नारगुंडा ६६.६० टक्के, पोयरकोठी मतदान केंद्रावर ६९.७६ टक्के, हालेदंडी केंद्रावर ५५ टक्के, तुर्रेमर्का केंद्रावर ४७.८२ टक्के मतदान झाले. धोडराज केंद्र क्र. १ वर ५४.७४ टक्के, धोडराज केंद्र क्र. २ वर ५१.७० टक्के, नेलगुंडा केंद्र क्र. १ वर ४१.३१ टक्के मतदान झाले. गोपनार केंद्रावर ६२.९२ टक्के, लाहेरी केंद्रावर ७१.६०, मल्लमपोडूर केंद्र क्र. १ वर ७० टक्के तर मल्लेमपोडूर केंद्र क्र. २ वर ५६.६१ टक्के मतदान झाले. गोंगवाडा येथील केंद्र क्र. १ वर ४५.८४ टक्के मतदान झाले असून या केंद्रावर २०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंगवाडा केंद्र क्र. २ वर २६५ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५६.८३ आहे. कोठी केंद्र क्र. १ वर एकूण ७२६ मतदारांपैकी ४५१ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ६२.१७ आहे. कोठी केंद्र क्र. २ वर २३० पैकी १३९ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ६०.४३ टक्के आहे. टेकला मतदान केंद्रावर ६१२ पैकी २६१ मतदारांनी मतदान केले. येथे ४२.६४ टक्के मतदान झाले. बोटनफुंडी केंद्रावर ७८४ मतदारांपैकी ४५३ जणांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५७.७८ आहे. बिसामुंडी केंद्रावर ५४६ पैकी २१३ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ३९ टक्के आहे. चिचोडा येथील केंद्रावर ५४.१८ टक्के मतदान झाले. २९१ मतदारांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. इरकडुम्मे येथील केंद्रावर ७६४ पैकी ४५९ मतदारांनी मतदान केले असून येथील मतदानाची टक्केवारी ६०.०७ आहे. मन्नेराजाराम केंद्र क्र. १ वर एकूण ४८० मतदारांपैकी २८० जणांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५८.२२ आहे. मन्नेराजाराम केंद्र क्र. २ वर ५२.६६ टक्के, बामनपल्ली केंद्रावर ४४.७८ टक्के, येचली येथील केंद्रावर ६४.१० टक्के, पल्ली येथील केंद्रावर ५२.६० टक्के तर चिचोडा केंद्रावर ४९.३२ टक्के मतदान झाले. (तालुका प्रतिनिधी) ९ हजार ८३८ मतदारांनी बजावला हक्क भामरागड तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी ३१ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या सर्वच केंद्रांवर तगड्या पोलीस बंदोबस्तात उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पडली. यंदा प्रथमच भामरागड तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. भामरागड तालुक्यात एकूण १७ हजार २०१ मतदार होते. यापैकी ९ हजार ८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८ हजार ६४५ पुरूष मतदारांपैकी ५ हजार ५९१ जणांनी मतदान केले. पुरूष मतदानाची टक्केवारी ६४.६७ आहे. तर महिला मतदानाची टक्केवारी ४९.६३ आहे.