शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मध केंद्र योजनेअंतर्गत गावकऱ्यांना 'मधाचे बोट'; शासन गावाला देणार ५४ लाखांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:45 IST

उद्योग उभारण्याची संधी : जिल्ह्यात मधनिर्मिती व्यवसायाला वाव

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मधमाश्या पालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती व्हावी यासाठी मध केंद्र योजना राबविली जात आहे. योजनेच्या माध्यमातून एका गावाला ५४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना मधाचा व्यवसाय थाटून उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी उपलब्ध असलेले पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्त्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणे, मधपाळ निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

असे आहे योजनेचे स्वरूप 'मधाचे गाव' या योजनेसाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान दिले जाईल. यापैकी १० टक्के हिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागेल. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना आपला हिस्सा भरावा लागेल. त्यानंतरच अनुदान जमा केले जाणार आहे. 

मधमाश्या पालनाचे प्रशिक्षण देणार मधमाशी पालन व्यवसायासाठी निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. तसेच तेथील सामग्री हाताळण्याबाबत मार्गदर्शनसुद्धा केले जाणार आहे. मधमाशी पालन करणासाठी संपूर्ण मदत शासनाच्या वतीने दिली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एक 'मधाचे गाव' प्रत्येक जिल्ह्यात मधाचे एक गाव निर्माण केले जाणार आहे. या गावातील इच्छुकांचा संघ तयार करून त्याद्वारे मधनिर्मिती केली जाईल.

उद्योगाला शासन प्रोत्साहन देणार राज्यातील वनसंपदा, फुलशेती, पीक उत्पादने, नैसर्गिक फुलोरा व मधमाशा पालन करणारे शेतकरी, मधपाळ या घटकांचा अभ्यास करून मधाच्या गावाची निवड केली जाईल. मधमाशांना पोषक असे वृक्ष, वनस्पतींच्या लागवडीपासून, मधमाशापालनासह मध संकलन, मध प्रक्रिया, बँडिंग व पॅकिंग करून उद्योगालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

"मधाचे गाव योजनेच्या लाभासाठी गाव निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या गावाला मध युनिटसाठी ५४ लाखांचे अनुदान मिळेल; परंतु, दुसऱ्या वर्षीपासून त्या युनिटची देखभाल व दुरुस्ती हा खर्च ग्रामपंचायत प्रशासनाला करावा लागेल."- विनायक मुलकलवार, मधुक्षेत्रिक, खादी व ग्रामोद्योग

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली