शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देसाईगंज दीक्षाभूमीसाठी ५४ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार ५९० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुशोभीकरण होणार : बौध्द महिला मंडळांनी केला होता शासनाकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार ५९० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व सम्यक जागृत बौध्द महिला समितीचे सचिव यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे रूप पालटण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत सम्यक जागृत बौध्द महिला महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.२९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाला लागून असलेल्या पटांगणात सभेसाठी आले होते. २५ मे १९५७ रोजी बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या उपस्थितीत येथील दीक्षाभूमी परिसरात दीक्षांत समारंभ पार पडला होता. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेला ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषीत करावे, अशी मागणी जिल्हाभरातील बौध्द बांधवांकडून होत होती. या जागेचा विकास करण्याचे काम सुरू असतानच नझूल व नगर परिषदेच्या कचाट्यात सदर जागा रखडली. अगदी सुरूवातीला दीक्षाभूमी समितीच्या ताब्यात एकूण १४ एकर जागा होती. ही जागा समितीच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी सहा हजार रूपयांचा भरणा करावा लागणार होता. मात्र तत्कालीन समिती पदाधिकारी ही रक्कम भरू शकले नाही. त्यामुळे ही जागा दीक्षाभूमी समितीच्या नावाने झाली नाही. कालांतराने या जागेवर अतिक्रमण वाढत गेले. त्यामुळे दीक्षाभूमीची जागा कमी होत गेली.सम्यक जागृत बौध्द महिला मंडळाच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार कृष्णा गजबे व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून शिल्लक असलेली साडेचार जागा समितीच्या नावाने हस्तांतरीत करण्यास मंजुरी दिली आहे. आमदार कृष्णा गजबे यांनीही स्थानिक विकास निधीतून स्टेजकरिता सात लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे स्तुप बांधण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याही बांधकामास लवकरच सुरूवात होईल, अशी माहिती जागृत बौध्द महिला महामंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली. यावेळी महिला मंडळाचे अध्यक्ष कविता मेश्राम, उपाध्यक्ष शामला राऊत, झूलझेबा डांगे, सचिव ममता जांभुळकर, सहसचिव जयश्री लांजेवार, सदस्य रमा बोदेले, विद्या लोखंडे, यशोदा मेश्राम, रत्नमाला बडोले, हिरा घडले, मंदा शिंपोलकर, गायश्री वाहने, शारदा मेश्राम, विश्रांती वाघमारे आदी उपस्थित होते.