शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे ५३८२ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:07 IST

इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र सदर योजनेच्या कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून हजारो विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत.

ठळक मुद्देमहाविद्यालयस्तरावर दिरंगाई : जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी लाभाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र सदर योजनेच्या कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून हजारो विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत. महाविद्यालयस्तरावर एकूण ५ हजार ३८२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून प्राप्त झाली आहे.भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या लाभासाठी यापूर्वी समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर केल्या जात होते. त्यानंतर शासनाने महाईस्काल अशी नवी वेबसाईट सुरू करण्यात आली. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा व गती आणण्यासाठी शासनाच्या वतीने यंदा २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून महाडीबीटी ही नवी वेबसाईट शिष्यवृत्ती योजनेसाठी सुरू करण्यात आली आहे.इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर विभागाच्या विविध अभ्यासक्रमाला शिकत असलेले मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी रितसर नोंदणी करून अर्ज सादर करतात. या अर्जाची सुरूवातीला महाविद्यालयस्तरावर तपासणी केली जाते. त्यानंतर हे अर्ज समाज कल्याण विभागाकडे पाठविले जातात. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील ४ हजार ५२ व २०१७-१८ या वर्षातील १ हजार ३३० अशी एकूण ५ हजार ३८२ अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्याची माहिती आहे. सन २०१६-१७ वर्षातील २४५ व २०१७-१८ वर्षातील ३६५ असे एकूण ६१० अर्ज समाज कल्याण विभागस्तरावर प्रलंबित आहे. २०१६-१७ वर्षातील प्रलंबित असलेले २४५ अर्ज समाज कल्याण विभागाने महाविद्यालय स्तरावर प्रतिपूर्तीसाठी पाठविले. मात्र अद्यापही या अर्जातील त्रुट्या दूर करण्यात आल्या नाही.यंदा ९ हजार ७०० विद्यार्थ्यांनी केली नोंदणीसन २०१८-१९ या चालू शैक्षणिक सत्रात विविध अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या जिल्ह्यातील एकूण ९ हजार ७०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या लाभासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर आॅनलाईन स्वरूपात नोंदणी केली आहे. यापैकी महाविद्यालयस्तरावर ५ हजार ७७० अर्ज प्रलंबित आहे. समाज कल्याण विभागाने परिपूर्ण दस्तावेज व त्रुट्या नसलेले जवळपास ५० अर्ज शिष्यवृत्तीच्या लाभासाठी मंजूर केले आहेत. विविध प्रकारच्या शुल्काला मान्यता देण्याचा अधिकार शासनाने यावर्षीपासून संबंधित त्या-त्या यंत्रणेला प्रदान केला आहे. शुल्काचे विवरण अपडेट करून संबंधित यंत्रणेशी त्याला मान्यता मिळाल्याशिवाय समाज कल्याण विभागाला शिष्यवृत्तीच्या अर्जास मंजुरी प्रदान करता येत नाही.महाविद्यालय स्तरावरून शिष्यवृत्ती योजनेच्या कामात योग्य ते सहकार्य मिळावे. विहित मुदतीत शिष्यवृत्ती अर्जाची संपूर्ण कार्यवाही पार पडून संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व लिपिकांच्या बैठका घेतल्या जात आहे. ज्या महाविद्यालयाकडून त्रुट्या दुरूस्त करून अर्ज सादर करण्यात आले नाही, अशा महाविद्यालयाचे प्राचार्य व लिपिकांची आता पुन्हा १८ डिसेंबर २०१८ रोजी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिष्यवृत्तीबाबतच्या सर्व अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया गतीने व्हावी, अशी विभागाची भूमिका आहे.- विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोलीमूळ दस्तावेज अपलोड करणे आवश्यकशिष्यवृत्तीच्या लाभासाठी यावर्षीपासून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तावेज संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. तशा सूचनाही सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग गडचिरोली कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना करण्यात आले आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, आवश्यक दस्तावेज अपलोड करून अचूकरित्या अर्ज सादर करण्यात यावा, अशा सूचनाही समाज कल्याण विभागाने यापूर्वीच महाविद्यालयांना दिल्या आहेत.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी