शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५२ हजार ८५२ शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:14 IST

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडा आणि बोंडअळीमुळे धान आणि कापूस पीकांचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देमावा-तुडतुडा व बोंडअळीने ग्रस्त : केवळ १६ हजार ६६३ शेतकऱ्यांना मिळाली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडा आणि बोंडअळीमुळे धान आणि कापूस पीकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जाहीर केलेल्या मदत वाटपाच्या निकषानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल ५२ हजार ८५२ शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने अपुरी मदत पाठविल्याने केवळ १६ हजार ६६३ शेतकऱ्यांनाच ही मदत मिळू शकली.शासनाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील ६९ हजार ५१५ शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यात ३४ कोटी १२ लाख धानपिकासाठी तर ४१ लाख ३६ हजार कापूस पिकाच्या नुकसानीसाठी आहेत. मात्र राज्य शासनाने मे महिन्यात पहिला हप्ता म्हणून केवळ ९ कोटी २० लाख रुपये पाठविले. ही रक्कम तत्काळ तालुकास्तरावर तहसीलदारांकडे वळती करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.पात्र शेतकऱ्यांना एकाचवेळी सर्व रक्कम देण्याऐवजी तीन टप्प्यात ती रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख रुपयेच शासनाकडून प्राप्त झाले. ती रक्कम वाटप केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने तातडीने ती रक्कम वाटप करण्यास सुरूवात केली. आजच्या स्थितीत ९ कोटी १९ लाख ९८ हजार ५३४ रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील रकमेची प्रतीक्षा प्रशासकीय यंत्रणेसह शेतकऱ्यांना लागली आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, कीटकनाशकासाठी पैशाची गरज आहे. अशा स्थितीत राज्य शासनाकडून लवकर मदतीची रक्कम मिळाल्यास त्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी बियाणे, खत, मजुरी यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. सर्वच शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे. पण शेतकऱ्यांना मदतीची रक्कम एकाचवेळी मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.मागणी जास्त आणि मदतीची रक्कम कमी अशी स्थिती असल्यामुळे कोणाला आधी मदत द्यायची आणि कोणाला थांबवून ठेवायचे, असाही प्रश्न प्रशासनापुढे असतो. त्याबाबतचा निर्णय तहसीलदार आपल्या स्तरावर घेत आहेत. धान रोवणीपूर्वी मदत द्यावी अशी मागणी होत आहे.शेतकरी सावकारांच्या दारीअनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामासाठी कृषी कर्ज घेण्यासाठी त्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. पण तिथेही कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारी जावी लागत आहे. कर्जमाफीसाठी पाठपुराव्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस