शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अबब... ५१९ गावे अजूनही कव्हरेजच्या बाहेरच, झाडावर चढले तरी येथून फाेन लागत नाही

By दिगांबर जवादे | Updated: September 24, 2023 15:55 IST

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. यातील निम्म्याहून गावे जंगलांनी वेढलेली आहेत.

गडचिराेली : जगाच्या धावपळीची गती लक्षात घेतली तर माेबाइल ही आता चैनीची वस्तू नाही तर आवश्यक वस्तू बनली आहे. इंटरनेट व माेबाइलचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक गावात माेबाइल कव्हरेज पाेहाेचविण्याचे शासनाचे आदेश आहेत. विस्तारत चाललेल्या माेबाइल बाजारपेठेचा फायदा उचलण्यासाठी बीएसएनएल साेबतच खासगी कंपन्याही ग्रामीण भागात टाॅवर उभारत आहेत. मात्र, गडचिराेली जिल्हा याला अपवाद आहे. बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ५१९ गावांमध्ये अजूनही माेबाइलचे कव्हरेज पाेहाेचलेले नाही. या गावांमध्ये झाडावर चढले तरी फाेन लागत नाही.

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. यातील निम्म्याहून गावे जंगलांनी वेढलेली आहेत. जिल्ह्यात दूरसंचार सेवेची सुरुवात बीएसएनएलने केली. ग्रामीण भागात टाॅवर उभारले. गरज लक्षात घेऊन टाॅवरची संख्या वाढवली. त्यामुळे अजूनही ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांकडे बीएसएनएलचेच सिम असल्याचे दिसून येते. फायद्याचे गणित मांडत नंतर खासगी कंपन्यांनीही ग्रामीण भागात टाॅवर उभारण्यास सुरुवात केली. मात्र, छत्तीगसड राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांपर्यंत अजूनही कव्हरेज पाेहाेचले नसल्याची शाेकांतिका आहे.बाॅक्स

२२० टाॅवरचे काम कधी पूर्ण हाेणार-जिल्ह्यात बीएसएनएलचे एकूण २१७ टाॅवर काम करीत आहेत. मात्र, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन पुन्हा बीएसएनएलने २२० टाॅवर प्रस्तावित केले आहेत. त्यांचे काम सुरू आहे. ते काम कधी पूर्ण हाेणार याची प्रतीक्षा आहे.

- खासगी कंपन्यांच्या टाॅवरची संख्या वाढत आहे. मात्र, जेथे फायद्याचे गणित आहे, त्याच ठिकाणी खासगी कंपन्या टाॅवर उभारतात. दुर्गम किंवा नक्षलग्रस्त भागात टाॅवर उभारत नाही. प्रामुख्याने तालुकास्थळी व शहरी भागातच माेबाइल टाॅवर उभारतात.बाॅक्स

देसाईगंज तालुक्यात प्रत्येक गावी कव्हरेजदेसाईगंज तालुक्यातील प्रत्येक गावात माेबाइलचे कव्हरेज पाेहाेचले आहे. खासगी कंपन्यांच्या टाॅवरची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सर्वच गावात कव्हरेज पाेहाेचलेला देसाईगंज हा एकमेव तालुका आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली