शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
6
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
7
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
8
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
9
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
10
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
11
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
12
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
13
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
14
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
15
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
16
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
17
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
18
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
19
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
20
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स

विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:19 IST

अल्पयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देतीन हजार रूपये दंड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अल्पयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.पीडित मुलगी २८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान आपल्या आई व मैत्रीणीसोबत बँकेत आधार लिंक करण्याकरिता जात होती. दरम्यान घराशेजारी राहणाऱ्या संजय सोमा मेश्राम याने पीडित मुलीची मान व कंबर पकडून तिला खाली पाडले. तिच्यासोबत असलेल्या आईने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पीडित बालिकेच्या आईला सुद्धा धक्का देऊन खाली पाडले. पीडित महिला कशीबशी पडत शेजारच्या घरी आश्रयाला गेली. पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यावरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३५४, ५०९, ३२३ चे सहकलम ८, १२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे साक्षीदारांचे बयान नोंदविला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने २७ एप्रिल रोजी निकाल देताना आरोपीला कलम ३५४ अन्वये दोषी ठरविले. यासाठी पाच वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार अधिनियम ५ अन्वये सश्रम कारावास, एक हजार रूपये दंड, कलम ३५४ (डी) (१) (आय) अन्वये तीन वर्षांचा कारावास व ५०० रूपये दंड, कलम ३२३ अन्वये एक वर्ष कारावास व ५०९ अन्वये तीन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.सदर निकाल विशेष सत्र न्यायाधीश श्रेणी १ यू.एम.पदवाड यांनी दिला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी काम पाहिले.

टॅग्स :jailतुरुंग