लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घरासमोर उभ्या असणाऱ्या मुलीवर लैंगिक शेरेबाजी करणाऱ्या व तिचा विनयभंग करणाºया दोन युवकांना न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरूवार दि.२४ ला मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे ही घटना अवघ्या आठवडाभरापूर्वी घडली आहेप्राप्त माहितीनुसार, १६ जानेवारी २०१९ रोजी गडचिरोली तालुक्यातील शिवणी गावातील आरोपी मोहन श्यामराव चुधरी (२५) आणि अजय अनुरथ तुमराम (१९) हे दोघे एका सायकलवर डबलसीट जात असताना पीडित मुलगी तिच्या घरासमोर उभी होती. यावेळी सदर युवकांनी तिच्यावर लैंगिक शेरेबाजी केली. त्यामुळे ती मुलगी आपल्या आईसोबत त्यांना जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता आरोपींनी तिला ओढाताण करून मारहाण केली. यात तिचा विनयभंग झाल्यामुळे तिने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पो.निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.दोन्ही आरोपींविरूद्ध सबळ साक्ष पुरावे असल्याने गुरूवारी (दि.२४) त्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी निकाल दिला. त्यात दोघांनाही कलम ३५४ अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, कलम ३२४ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, कलम ५०९ अन्वये ३ वर्ष साधा कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. यात सरकार पक्षातर्फे अॅड.योगिता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी हवालदार यशवंत मलगाम तर कोर्ट मोहरर म्हणून सुभाष सोरते यांनी काम पाहिले.
विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना ५ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:55 IST
घरासमोर उभ्या असणाºया मुलीवर लैंगिक शेरेबाजी करणाऱ्या व तिचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरूवार दि.२४ ला मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे ही घटना अवघ्या आठवडाभरापूर्वी घडली आहे
विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना ५ वर्षांचा कारावास
ठळक मुद्देआठवडाभरात निकाल : १६ हजार रुपये द्रव्यदंडाचीही शिक्षा