गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत १४ डिसेंबर रोजी रविवारला गडचिरोली शहरातील एकूण १७ केंद्रांवरून महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. सदर टीईटी परीक्षा दोनही पेपरचे मिळून एकूण ४ हजार ८१२ भावी शिक्षक देणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गतवर्षीपासून भावी शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. या परीक्षेकरिता आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर हॉर्डकॉपी स्वरूपात अर्ज स्वीकारण्यासाठी संकलन केंद्र स्थापन करण्यात आले होते. टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक १ साठी गडचिरोली शहरातील ११ केंद्रांवर ३० पर्यवेक्षक व १२७ समवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. पेपर क्रमांक २ साठी १५ पर्यवेक्षक व ६७ समवेशकाची नियुक्ती झाली आहे.जि. प. हायस्कूल, शिवाजी हायस्कूल गोकुलनगर, शिवाजी महाविद्यालय, स्कूल आॅफ स्कालर्स, कारमेल हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन, साईनाथ अध्यापक विद्यालय मुरखळा, संत गाडगेबाबा विद्यालय, राणी दुर्गावती कन्या विद्यालय, महिला महाविद्यालय आदीसह गडचिरोली शहरातील एकूण १७ केंद्र टीईटी परीक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. रविवारी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी चार भरारी पथक ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी व डायट प्राचार्याच्या पथकांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
४,८१२ उमेदवार देणार टीईटी परीक्षा
By admin | Updated: December 10, 2014 22:58 IST